जेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?

प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात. 

Updated: Apr 29, 2016, 12:14 PM IST
जेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत? title=

मुंबई : प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात. मात्र जेव्हा एखादा मुलगा खऱ्या प्रेमात पडतो तेव्हा काय होत? जेव्हा मुलं प्रेमात पडतात तेव्हा ते या ५ गोष्टी करतात.

१. जेव्हा एखादा मुलगा प्रेमात पडतो तेव्हा तो त्या मुलीशी वायफळ गोष्टी बोलणे बंद करतो. भविष्यातील प्लानबाबत चर्चा करणे त्याला आवडते. 

२. खऱं प्रेम तो कोणापासून लपवू इच्छित नाही. त्यामुळे आपले मित्र, लहान भाऊ-बहिण यांच्याशी तो त्या मुलीची भेट घडवून आणतो. अनेकदा तर तो आपल्या आईचीही त्या मुलीशी भेट घडवून देतो. 

३. प्रेमात पडल्यानंतर मुलाची मुलीच्या घरच्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. तसेच त्यांना भेटण्यासाठी तो उत्सुक असतो. 

४. यावेळी मुले अधिक केअरिंग बनतात. मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकडे ते लक्ष देतात.

५. जेव्हा खरं प्रेम होत तेव्हा त्या मुलीबाबतचा विश्वास अधिक दृढ व्हायला लागतो.