लॉन्च पूर्वी शाओमी रेडमी नोट ४ या साइटवर उपलब्ध

 चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवा हँडसेट भारतात येत्या १९ जानेवारी म्हणजे उद्या लॉन्च करणार आहे. फोन अधिकृतपणे लॉन्चिंग करण्यापूर्वी हा फोन ई-कॉमर्ससाईट ईबेवर उपलब्ध आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 18, 2017, 07:36 PM IST
लॉन्च पूर्वी शाओमी रेडमी नोट ४ या साइटवर उपलब्ध  title=

नवी दिल्ली :  चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवा हँडसेट भारतात येत्या १९ जानेवारी म्हणजे उद्या लॉन्च करणार आहे. फोन अधिकृतपणे लॉन्चिंग करण्यापूर्वी हा फोन ई-कॉमर्ससाईट ईबेवर उपलब्ध आहे. 

ई-बेवर हा फोन १९९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी ऑनलाइन कसा उपलब्ध झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झी मीडिया लॉन्चपूर्वी हा फोन खरेदी न करण्याचा सल्ला देत आहे. 

काय आहे यात खास

- या फोनमध्ये  2.5डी कर्व्ड ग्लाससह 5.5 इंचचा फुल एचडी डिस्पले आहे. 

- हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज डेका-कोर मीडियाटेक हीलियो एक्स20 प्रोसेसर आहे. 

- भारतीय मार्केटमध्ये हा फोन 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 625 प्रोसेसर आणि एड्रेनो 506 जीपीयू सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. 

- याची इंटरनल मेमरीला माइक्रोएसडी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. 

- फोटोग्राफीसाठी यात 13 एमपी रियर आणि  5 एमपी फ्रंट कॅमरा आहे. 

- 4100 एमएएचला बॅटरी देण्यात आली आहे. 

- हा फोन अँड्राइड 6.0 मार्शमैलोवर काम करणार आहे. यात  MIUIची 8 atop स्कीन देण्यात आली आहे.