क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का; टी-20 वर्ल्डकपपूर्वी 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती

जून महिन्यात टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यावेळी एक स्फोटक फलंदाजाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

| May 10, 2024, 10:59 AM IST
1/7

न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरोने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 

2/7

मुनरोने वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

3/7

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन शतकं झळकावणाऱ्या या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तत्काळ अलविदा केल्याने सर्वांना मोठा प्रश्न पडलाय.

4/7

कॉलिन मुनरोने गेल्या 4 वर्षांपासून न्यूझीलंडकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. 

5/7

कॉलिन मुनरोने न्यूझीलंडसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2 फेब्रुवारी 2020 रोजी भारताविरुद्ध खेळला होता. 

6/7

मुनरोने न्यूझीलंडकडून 1 टेस्ट, 57 वनडे आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

7/7

मुनरो हा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय टी-30 फॉर्मेटध्ये तीन शतकं झळकावली आहेत.