Curry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर

Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.   

Jul 17, 2023, 13:31 PM IST

Curry Leaves : रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कढीपत्ता. वरणापासून ढोकळ्यापर्यंत कढीपत्त्याशिवाय पदार्थ हा अपूर्णंच...अनेक जण पदार्थांतील कढीपत्ता ताटात बाजूला काढून ठेवतात. तर टवटवीत कढीपत्ता दोन ते तीन पेक्षा जास्त फ्रेश राहत नाही. तो सुकतो म्हणून अनेक जण तो फेकून देतात. जर तुम्ही पण असं करत असाल तर थांबा. कढीपत्ताचे आरोग्याला होणारे फायदे आणि सुकलेल्या कढीपत्ताचा वापर याबद्दल जाणून तुम्ही आजपासूनच कढीपत्ता खाण्यास सुरुवात कराल. 

 

1/10

कढीपत्ता फ्रेश आणि हिरवागार राहण्यासाठी टिप्स (Tips for storing curry leaves)

बाजारातून कढीपत्ता आणला की त्याची पानं वेगळी करुन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका सुती कपड्यावर पंख्याखाली पानं सुकत घाला.   

2/10

आता ते चांगले पुसून एका एअर टाइट डब्यात टिश्यू पेपर टाकून त्यावर हे कढीपत्ता ठेवा. शिवाय वरूनदेखील एक टिश्यू पेपर ठेवा आणि आता हा डबा फ्रिजमध्ये ठेवा. 

3/10

जर तुमच्याकडे एअर टाइट डबा नसेल तर झीप लॉक प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू शकता. मात्र या बॅगेतून कढीपत्ता काढताना बॅग लॉक व्यवस्थित झाली आहे का हे नक्की तपासा.   

4/10

कढीपत्ता सुकतो म्हणून तुम्ही फेकून देता तर असं न करता त्याची पावडर बनवून ठेवा. या पावडरचेही अनेक फायदे आहेत. 

5/10

कढीपत्त्याचे फायदे

करी पावडर ही अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते. या पावडरच्या सेवनाने  जळजळ दूर होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.   

6/10

कढीपत्तामधील लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे ए आणि सी हे आरोग्यासाठी वरदान असतं. 

7/10

 कढीपत्ता पावडर सेवन केल्याने मधुमेहींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतं. शिवाय किडनीसाठीही कढीपत्ता पावडर उपयोगी ठरते. 

8/10

 लांब सडक आणि सुंदर केसांसाठी कढीपत्ता पावडर ही अतिशय फायदेशीर ठरते. त्याशिवाय सौंदर्यासाठीही कढीपत्ता पावडरचा उपयोग केला जातो.   

9/10

कढीपत्ता पावडरचा उपयोग तुम्ही पदार्थ्यांची चव वाढविण्यासाठी करु शकता. अगदी मॅरीनेशनपासून ग्रेव्हीची चव वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 

10/10

कढीपत्ता छान स्वच्छ धुवून वाळवून त्याची मिक्सरमधून पावडर बनवा. आता ही पावडर एका एअर टाइट डब्यात ठेवा. या पावडरची चटणीही खूप चांगली लागते.