मराठी पाऊल पडते पुढे! प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केले मिसळ आऊटलेट, म्हणाला 'एक स्वप्नं...'

 विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या मिसळचे कौतुक केले होते. 

Apr 05, 2024, 23:24 PM IST

 विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या मिसळचे कौतुक केले होते. 

 

1/10

मिसळ खाण्याची इच्छा

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

मिसळ म्हटलं की आपल्या तोंडाला हमखास पाणी सुटतं. कडधान्ये, झणझणीत तर्री त्यावर टाकलेले फरसाण आणि लिंबू हे वर्णन ऐकलं लगेचच मिसळ खाण्याची इच्छा होते.

2/10

मराठमोळ्या सेलिब्रेटी जोडप्याने सुरु केले मिसळचे आऊटलेट

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

मुंबईत हल्ली मोठमोठ्या रेस्टॉरंटपासून ते अगदी रस्त्यावरच्या स्टॉलवरही मिसळ पाव सहज उपलब्ध असतो. मुंबईकरांचं मिसळप्रेम लक्षात घेऊनच एका मराठमोळ्या सेलिब्रेटी जोडप्याने मिसळचे आऊटलेट सुरु केले आहे.  

3/10

बोरिवलीत मिसळचे आऊटलेट

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

अभिनेत्री स्वाती देवल आणि 'चला हवा येऊ द्या' या शोचा संगीत दिग्दर्शक तुषार देवल यांनी बोरिवलीत मिसळचे आऊटलेट सुरु केले आहे.

4/10

टॅगलाईनने वेधलं लक्ष

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

'देवल मिसळ' असे त्यांच्या मिसळच्या दुकानाचे नाव आहे. 'लहान ते ज्येष्ठ...देवल मिसळ सर्वांसाठी बेस्ट...!' अशी टॅगलाईन त्यांनी दिली आहे. 

5/10

भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्धाटन

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

नुकतंच तुषार आणि स्वातीच्या देवल मिसळच्या दुकानाचे उद्धाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाशभाऊ दरेकर, प्रकाश सुर्वे हे उपस्थित होते.  

6/10

पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

'आज माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या (देवल मिसळ )च आउटलेट चालू झालंय', अशा शब्दात तुषारने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

7/10

मिसळ खाण्यासाठी दिले आमंत्रण

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

'आपण सर्वांनी लवकरात लवकर मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर यावे', असे आमंत्रणही तुषारने सर्वांना दिले आहे.   

8/10

राज ठाकरेंकडूनही मिसळचे कौतुक

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

तुषार आणि स्वातीने बोरिवलीत भव्य मिसळ महोत्सवावेळी मिसळ स्टॉल सुरु केला होता. या स्टॉलला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या मिसळचे कौतुक केले होते.  

9/10

संगीतकार म्हणून प्रसिद्धीझोतात

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

दरम्यान तुषार देवल हा संगीत संयोजक आणि संगीतकार म्हणून काम करतो. तुषार देवल हा कधी एखाद्या प्रसंगाला योग्य संगीत देत, तर कधी आगरी भाषेमध्ये हटके बोलत तो प्रेक्षकांची मन जिंकतो.  

10/10

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे लोकप्रिय

Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Started Misal outlet in borivali share photos

तुषार देवलची पत्नी स्वाती देवल ही 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. तिने ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.