270 लिटर पेट्रोलचे पैसे वाचले; सिंगल राइडमध्ये 6,727Km प्रवास, F77 इलेक्ट्रिक बाइकने रचला इतिहास

  F77 इलेक्ट्रिक बाइकने सिंगल राइडमध्ये 6,727Km प्रवास केला आहे. 

Sep 05, 2023, 21:44 PM IST

Ultraviolette F77: बेंगळुरू येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअपने कमाल केली आहे. F77 इलेक्ट्रिक बाइकने इतिहास रचला आहे. या बाईकने सिंगल राइडमध्ये 6,727Km इतका प्रवास केला आहे. या बाईकच्या रेकॉर्डची जोरदार चर्चा आहे. 

1/7

बेंगळुरू येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेटने लाँच केलेल्या Ultraviolette F77 बाईकने नवा विक्रम रचला आहे. ही बाइक अनेक स्पोट्स बाईकन टक्कर देत आहे. 

2/7

बाईकच्या दोन्ही बॅटरीसह 8 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी कंपनी देत ​​आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3.8 लाख रुपये इतकी आहे. 

3/7

 या बाईकचा टॉप स्पीड 147 किलोमीटर प्रति तास इतका आहे. 10.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक भारतात आतापर्यंत कोणत्याही इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये वापरण्यात आलेला नाही.

4/7

F77 बाइकमध्ये 38.8 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करणारे पावरफुल इंजीन आहे. 7.1 kWh आणि 10.3 kWh अशा दोन बॅटरी पॅकमध्ये ही बाईक येते. हे बॅटरी पॅक अनुक्रमे 206 किमी आणि 307 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.   

5/7

22 दिवसांच्या प्रवासादरम्यान बाईकने 45 अंशांपेक्षा जास्त आणि उणे (-15) अंश सेल्सिअस तापमानात प्रवास केला. प्रवासादरम्यान बाईकवर 55  किलोचे अतिरिक्त सामनाचे वजन होते.   

6/7

Ultraviolette F77 या बाईकने 22 दिवसांत 14 दुर्गम भागातून 6,727Km इतका प्रवास केला. 21 मे 2023 रोजी चेन्नई येथून सुरू झालेला प्रवास 12 जून 2023 रोजी बेंगळुरूमध्ये संपला. 

7/7

F77 इलेक्ट्रिक बाइकने सिंगल राइडमध्ये 6,727Km प्रवास केला आहे. या बाईकची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.