काय खरं, काय खोटं... कोणी मारलं?

Mar 20, 2013, 17:37 PM IST
1/14

दोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूरwww.24taas.com, मुंबईविधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे `बहुजन विकास आघाडी`चे आमदार क्षितिज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. जर या प्रकरणात मी दोषी असेन, तर माझ्यावर कारवाई करा, मी तयार आहे असंही ठाकूर म्हणाले.वांद्रे-वरळी सी- लिंक येथे काल सोमवार रोजी आमदार क्षितिज ठाकूर यांची कार अडवली होती. कारची वेगमर्यादा अधिक असल्याबद्दल त्यांना ७०० रुपये दंड ठोठावण्यात ला होता. यावर मिळालेल्या पावतीमध्ये दोन कलमं लिहिली होती. दुसरं कलम कशासाठी याचं उत्तर जेव्हा आपण सूर्यवंशीना विचारलं, तेव्हा त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली असं क्षितीज ठाकुर यांचं म्हणणं आहे. जर लोकप्रतिनिधींशी अशा भाषेत सूर्यवंशी बोलत असतील, तर सामान्य माणसाशी कसे बोलत असतील? असा सवालही ठाकुर यांनी केला होता. आज हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतानाही प्रेक्षक गॅलरीतून सूर्यवंशी यांनी आक्षेपार्ह हातवारे करत आपल्याला धमकी दिल्याचं क्षितीज ठाकूर यांचं म्हणणं आहे. सूर्यवंशींना जी मारहाण केली गेली, त्यात इतर आमदारांनी मला पाठिंबा दिला. मात्र या हाणामारीची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असं ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसंच, जर माझी काही चूक आढळली, तर मी उद्या राजीनामा देईल. माझी लढाई पोलीस खात्याशी नाही, तर अशा वृत्तीशी आहे. आरेरावीने वागणाऱ्या सूर्यवंशींना धडा शिकवणं आवश्यक होतं. त्याबद्दल मला खेद नाही. मी सूर्यवंशींची माफी मागणार नाही. असं क्षितीज ठाकुर यांनी स्पष्ट केलं.

दोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर
www.24taas.com, मुंबई

विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे `बहुजन विकास आघाडी`चे आमदार क्षितिज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. जर या प्रकरणात मी दोषी असेन, तर माझ्यावर कारवाई करा, मी तयार आहे असंही ठाकूर म्हणाले.
वांद्रे-वरळी सी- लिंक येथे काल सोमवार रोजी आमदार क्षितिज ठाकूर यांची कार अडवली होती. कारची वेगमर्यादा अधिक असल्याबद्दल त्यांना ७०० रुपये दंड ठोठावण्यात ला होता. यावर मिळालेल्या पावतीमध्ये दोन कलमं लिहिली होती. दुसरं कलम कशासाठी याचं उत्तर जेव्हा आपण सूर्यवंशीना विचारलं, तेव्हा त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली असं क्षितीज ठाकुर यांचं म्हणणं आहे. जर लोकप्रतिनिधींशी अशा भाषेत सूर्यवंशी बोलत असतील, तर सामान्य माणसाशी कसे बोलत असतील? असा सवालही ठाकुर यांनी केला होता.

आज हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतानाही प्रेक्षक गॅलरीतून सूर्यवंशी यांनी आक्षेपार्ह हातवारे करत आपल्याला धमकी दिल्याचं क्षितीज ठाकूर यांचं म्हणणं आहे. सूर्यवंशींना जी मारहाण केली गेली, त्यात इतर आमदारांनी मला पाठिंबा दिला. मात्र या हाणामारीची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असं ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसंच, जर माझी काही चूक आढळली, तर मी उद्या राजीनामा देईल. माझी लढाई पोलीस खात्याशी नाही, तर अशा वृत्तीशी आहे. आरेरावीने वागणाऱ्या सूर्यवंशींना धडा शिकवणं आवश्यक होतं. त्याबद्दल मला खेद नाही. मी सूर्यवंशींची माफी मागणार नाही. असं क्षितीज ठाकुर यांनी स्पष्ट केलं.

2/14

का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?www.24taas.com, मुंबईआमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार यांच्यात वांद्रे वरळी सी-लिंकवर वाद झाला होता. ठाकूर यांची कार ११०च्या वेगाने चालवली जात होती. त्यामुळे सूर्यवंशी यांनी ठाकूर यांची कार आडवली आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला. या गोष्टीचाच राग ठाकूर यांच्या मनात होता. विधानसभेमध्येही त्यांनीसूर्वंशी विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.  यावेळी स्वतः सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. ही गोष्ट कळताच विधानभवन परिसरातच सूर्यवंशी आणि ठाककुर यांच्यात वाद झाला. त्यावर विधानसभेत गोंधळ होऊन कामकाज तहकुब करावं लागलं. यानंतर सर्व आमदारांनी सूर्यवंशी यांना बाहेर बोलावून घेतलं. आणि विधान भवन परिसरात सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे सूर्वंशी बेशुद्ध पडले आणि त्यांना विधीमंडळातून स्ट्रेचरवरून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
www.24taas.com, मुंबई

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार यांच्यात वांद्रे वरळी सी-लिंकवर वाद झाला होता. ठाकूर यांची कार ११०च्या वेगाने चालवली जात होती. त्यामुळे सूर्यवंशी यांनी ठाकूर यांची कार आडवली आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला. या गोष्टीचाच राग ठाकूर यांच्या मनात होता. विधानसभेमध्येही त्यांनीसूर्वंशी विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.
यावेळी स्वतः सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. ही गोष्ट कळताच विधानभवन परिसरातच सूर्यवंशी आणि ठाककुर यांच्यात वाद झाला. त्यावर विधानसभेत गोंधळ होऊन कामकाज तहकुब करावं लागलं. यानंतर सर्व आमदारांनी सूर्यवंशी यांना बाहेर बोलावून घेतलं. आणि विधान भवन परिसरात सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे सूर्वंशी बेशुद्ध पडले आणि त्यांना विधीमंडळातून स्ट्रेचरवरून सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

3/14

मी पोलिसाला मारले नाही- राम कदमwww.24taas.com, मुंबईमनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.विधीमंडळात सर्वपक्षीय आमदारांनी पोलिस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे स्पष्टीकरण देण्यासाठी आमदारांनी विधीमंडळाबाहेर पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी राम कदम यांनी हे स्पष्टीकरण दिले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझा पक्ष सदैव पोलिसांच्या पाठिशी आहेत. विधानसभेत अनेक वेळा मुंबईच्या पोलिसांच्या बाबतीत आवाज मी आवाज उठवला असल्याचे राम कदम यांनी सांगितले. सीएसटीला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनीही आपल्या भाषणात पोलिसांची बाजू घेतली होती. त्यामुळे आम्ही पोलिसाच्या विरोधात नाही. परंतु, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह इशारे केले आणि उर्मट भाषा ही कायम ठेवली. आज दुपारपासून वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या हे अर्धसत्य आहे. मनसे हा पोलिस अधिकाऱ्यांवर हात उगारणारा पक्ष नाही. मी तर हात उचललाच नाही. दुसरं म्हणजे विधान परिषदेचे अध्यक्ष वसंत डावखरे यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याची उर्मट भाषा कायम होती. त्यावेळी क्षितिजने स्वतःहून माघार घेण्याची भूमिका घेतली होती. पण अधिकाऱ्याने सांगितलं, की तुला काय उखाडायचं ते उखाडून घे. अशी अश्लिल भाषा वापरून क्षितिज ठाकूर यांनी चिथावण्याचा प्रयत्न केल्याचे राम कदम यांनी सांगितले.विधान सभा हे सार्वभौम आहे. त्याचा आम्ही सर्व आमदार सन्मान करतो. लोकशाही मार्गाने क्षितीज ठाकूर यांनी विधानसभेत हक्कभंग ठराव सादर केल्यानंतर सभागृह तहकूब झालं. सभागृह तहकूब झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग मांडतो, तो बालकनीत बसला होता. त्यानंतर त्याने आमदारांना शिवीगाळ केली आणि आमदारांना अश्लिल इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने मला धक्काबुक्की केली त्यात मी जमिनीवर पडल्याचे राम कदम यांनी यावेळी सांगितले. टीव्हीवर दाखविण्यात येते की ४-५ आमदारांना पोलिसांना मारहाण केली. पण ही बातमी चुकीची आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज सभागृह अध्यक्षांकडे आहे. ते मीडियाने पाहावे. यावेळी ४०-५० जणांना जमाव होता. त्या जमावाची रेटारेटी झाली. ज्यांचे चेहरे लोकांना माहिती आहेत. त्याच आमदारांचे नाव मीडियामध्ये आल्याचे राम कदम यांनी सांगितले.

मी पोलिसाला मारले नाही- राम कदम
www.24taas.com, मुंबई
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.

विधीमंडळात सर्वपक्षीय आमदारांनी पोलिस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे स्पष्टीकरण देण्यासाठी आमदारांनी विधीमंडळाबाहेर पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी राम कदम यांनी हे स्पष्टीकरण दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझा पक्ष सदैव पोलिसांच्या पाठिशी आहेत. विधानसभेत अनेक वेळा मुंबईच्या पोलिसांच्या बाबतीत आवाज मी आवाज उठवला असल्याचे राम कदम यांनी सांगितले. सीएसटीला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनीही आपल्या भाषणात पोलिसांची बाजू घेतली होती. त्यामुळे आम्ही पोलिसाच्या विरोधात नाही. परंतु, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह इशारे केले आणि उर्मट भाषा ही कायम ठेवली.

आज दुपारपासून वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या हे अर्धसत्य आहे. मनसे हा पोलिस अधिकाऱ्यांवर हात उगारणारा पक्ष नाही. मी तर हात उचललाच नाही. दुसरं म्हणजे विधान परिषदेचे अध्यक्ष वसंत डावखरे यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याची उर्मट भाषा कायम होती. त्यावेळी क्षितिजने स्वतःहून माघार घेण्याची भूमिका घेतली होती. पण अधिकाऱ्याने सांगितलं, की तुला काय उखाडायचं ते उखाडून घे. अशी अश्लिल भाषा वापरून क्षितिज ठाकूर यांनी चिथावण्याचा प्रयत्न केल्याचे राम कदम यांनी सांगितले.

विधान सभा हे सार्वभौम आहे. त्याचा आम्ही सर्व आमदार सन्मान करतो. लोकशाही मार्गाने क्षितीज ठाकूर यांनी विधानसभेत हक्कभंग ठराव सादर केल्यानंतर सभागृह तहकूब झालं. सभागृह तहकूब झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग मांडतो, तो बालकनीत बसला होता. त्यानंतर त्याने आमदारांना शिवीगाळ केली आणि आमदारांना अश्लिल इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने मला धक्काबुक्की केली त्यात मी जमिनीवर पडल्याचे राम कदम यांनी यावेळी सांगितले.

टीव्हीवर दाखविण्यात येते की ४-५ आमदारांना पोलिसांना मारहाण केली. पण ही बातमी चुकीची आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज सभागृह अध्यक्षांकडे आहे. ते मीडियाने पाहावे. यावेळी ४०-५० जणांना जमाव होता. त्या जमावाची रेटारेटी झाली. ज्यांचे चेहरे लोकांना माहिती आहेत. त्याच आमदारांचे नाव मीडियामध्ये आल्याचे राम कदम यांनी सांगितले.

4/14

मनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबनwww.24taas.com, मुंबईमनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. यात मनसे आमदार राम कदम यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आता पक्ष आणि पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे राम कदम यांच्यावर काही कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तर आमदार राम कदम यांचे सगळ्यात आधी निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. त्याचवेळेस राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते. मारहाणीच्या या प्रकरणात मात्र राम कदम यांच्यावर मात्र पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत चार जणांवरही कारवाई केली गेली आहे, तसेच या पाचही आमदारांना कोणत्याही क्षणी अटकेला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पक्ष आमदारांवर कारवाई करणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबन
www.24taas.com, मुंबई

मनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. यात मनसे आमदार राम कदम यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आता पक्ष आणि पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे राम कदम यांच्यावर काही कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तर

आमदार राम कदम यांचे सगळ्यात आधी निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. त्याचवेळेस राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांच्या श्रीमुखात भडकावली होती. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते.








मारहाणीच्या या प्रकरणात मात्र राम कदम यांच्यावर मात्र पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत चार जणांवरही कारवाई केली गेली आहे, तसेच या पाचही आमदारांना कोणत्याही क्षणी अटकेला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभेत त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पक्ष आमदारांवर कारवाई करणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

5/14

आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.www.24taas.com,मुंबईकर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.संपूर्ण राज्यात आमदारांकडून पोलिसाला झालेल्या मारहाणीमुळे संताव व्यक्त होत आहे. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही, अशी भाषा करणारे गृहमंत्री आमदारांच्या मारहाणीबाबत वेगळीच भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. आर आर यांनी सावध भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आपण अद्याप पाहिलेले नसल्याचे आबांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस करण्यासाठी आर. आर. यांनी संबंधीत रुग्णालयाला भेट दिली. या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर पडलेल्या गृहमंत्र्यांवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. एरवी चिमटे काढत, किस्से सांगत पत्रकारांना सामोरे जाणारे आबा आज सावध भूमिकेत दिसले.मारहाण प्रकरणातील दोषींना कडक शासन केले जाईल. या घटनेचा पोलिसांच्या मनोधैधर्यावर अजिबात परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे आर आर यांनी सांगून सूर्यवंशींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले.दरम्यान, आर आर यांनी मोठा खुलासा केलाय. ड्युटीवर असलेले सूर्यवंशी हे प्रेक्षक गॅलरीत गेलेच नव्हते. त्यांचा पाठलाग करून हल्ला करण्यात आल्याचे सूर्यवंशींचे म्हणणे आहे.

आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
www.24taas.com,मुंबई

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संपूर्ण राज्यात आमदारांकडून पोलिसाला झालेल्या मारहाणीमुळे संताव व्यक्त होत आहे. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही, अशी भाषा करणारे गृहमंत्री आमदारांच्या मारहाणीबाबत वेगळीच भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. आर आर यांनी सावध भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आपण अद्याप पाहिलेले नसल्याचे आबांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस करण्यासाठी आर. आर. यांनी संबंधीत रुग्णालयाला भेट दिली. या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर पडलेल्या गृहमंत्र्यांवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. एरवी चिमटे काढत, किस्से सांगत पत्रकारांना सामोरे जाणारे आबा आज सावध भूमिकेत दिसले.








मारहाण प्रकरणातील दोषींना कडक शासन केले जाईल. या घटनेचा पोलिसांच्या मनोधैधर्यावर अजिबात परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे आर आर यांनी सांगून सूर्यवंशींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले.

दरम्यान, आर आर यांनी मोठा खुलासा केलाय. ड्युटीवर असलेले सूर्यवंशी हे प्रेक्षक गॅलरीत गेलेच नव्हते. त्यांचा पाठलाग करून हल्ला करण्यात आल्याचे सूर्यवंशींचे म्हणणे आहे.

6/14

कुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !www.24taas.com, मुंबईएपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.पोलिसांनी आता संबंधित आमदारांच्या अटकेसाठी तयारी करायला सुरूवात केली आहे. सचिन सूर्यवंशींनी आपल्या वक्तव्यात मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नावांचा उल्लेख केला. त्यामुळे या दोन आमदारांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र या आमदारांना अटकपूर्व जामीनही मिळू शकतो.आमदार त्यांना होणाऱ्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्याशिवाय इतर कोण आमदार मारहाण करत होते, हे राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्या चौकशीतून पुढे येईल.

कुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
www.24taas.com, मुंबई

एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.

पोलिसांनी आता संबंधित आमदारांच्या अटकेसाठी तयारी करायला सुरूवात केली आहे. सचिन सूर्यवंशींनी आपल्या वक्तव्यात मनसेचे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नावांचा उल्लेख केला. त्यामुळे या दोन आमदारांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र या आमदारांना अटकपूर्व जामीनही मिळू शकतो.

आमदार त्यांना होणाऱ्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्याशिवाय इतर कोण आमदार मारहाण करत होते, हे राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांच्या चौकशीतून पुढे येईल.

7/14

पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबनwww.24taas.com, मुंबई साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या आमदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मारहाण करणाऱ्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता होती. शिवाय या पाच आमदारांना पोलीस कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे.पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यामुळं आज या आमदारांवर निलंबन कारवाई झाली.

पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
www.24taas.com, मुंबई

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.

भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या आमदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मारहाण करणाऱ्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता होती. शिवाय या पाच आमदारांना पोलीस कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे.

पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश आहे. दोषींविरोधात कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिले होते. त्यामुळं आज या आमदारांवर निलंबन कारवाई झाली.

8/14

हे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार – सूर्यवंशीwww.24taas.com, मुंबईसाहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?मंगळवारी विधान भवनात सूर्यवंशी यांना भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या या आमदारांनी मला मारहाण केली त्यामुळे मी माझ्या सरकारी नोकरीचा राजीमाना देणार आहे. मला आता नोकरीच करायची नाही, अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिलेय. मला झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांचे मनोर्धैय खचले आहे. हे लोकप्रतिनिधी नसून हे गुंड आहेत, अशी प्रतिक्रिया सूर्य़वंशी यांनी दिली.दरम्यान, सचिन सूर्यवंशी यांच्या आईने त्यांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात धाव घेतली आहे. आमदारांकडून झालेल्या मारहाणीचे दु:ख होत आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सूर्यवंशी यांच्या आईने केली आहे.

हे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार – सूर्यवंशी
www.24taas.com, मुंबई

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?

मंगळवारी विधान भवनात सूर्यवंशी यांना भारिप आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या या आमदारांनी मला मारहाण केली त्यामुळे मी माझ्या सरकारी नोकरीचा राजीमाना देणार आहे. मला आता नोकरीच करायची नाही, अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिलेय. मला झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांचे मनोर्धैय खचले आहे. हे लोकप्रतिनिधी नसून हे गुंड आहेत, अशी प्रतिक्रिया सूर्य़वंशी यांनी दिली.

दरम्यान, सचिन सूर्यवंशी यांच्या आईने त्यांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात धाव घेतली आहे. आमदारांकडून झालेल्या मारहाणीचे दु:ख होत आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सूर्यवंशी यांच्या आईने केली आहे.

9/14

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखलwww.24taas.com, दीपक भातुसे एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. याप्रकरणी कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर एपीआय सूर्यंवशींना मारहाण केली नाही, मात्र त्यांची वागणूक अरेरावीची असल्याचा दावा आरोप असणा-या आमदारांनी केलाय. या आमदारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विधान भवन परिसरात एपीआय सचिन सूर्यवंशी यांची मारहाणीनंतर त्यांना थेट स्ट्रेचरवरुनच हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. विशेष म्हणजे कायदेमंडळात कायदा तयार करणा-या आमदारांनीच त्यांची ही अशी अवस्था केली.. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी टोलनाक्यावर झालेल्या वादानंतर विधानभवनात हा राडा झाला.. सूर्यवंशींविरोधात हक्क्भंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. त्यानंतर विधानभवनात क्षितीज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.. आणि त्यानंतर काही आमदारांनी घेरुन सूर्यवंशींची वाईट अवस्था केली. विधान भवनाच्या मर्यादेलाच न शोभणारं हे कृत्य घडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.. यानंतर संतप्त झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी थेट विधानभवन गाठलं. पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आणि हिमांशू रॉय यांनी या मारहाणप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत खेद व्यक्त करत, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. तर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाचा निषेध करत, दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. दोषी आमदारांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी मारहाणीचे आरोप असलेल्या आमदारांनी एपीआय सूर्यवंशीच अरेरावी करत असल्याचं सांगत त्याचे पुरावे म्हणून सीडीही माध्यमांना दिली. क्षितीज ठाकूर यांनी झालेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत, दोषी आढळल्यास राजीनामा देईन अशी भूमिका घेतली. राम कदमांनी तर आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा केला.आमदारांनी ते आम्ही नव्हेच अशी भूमिका घेतली असली तरी एपीआय सूर्यवंशींना मारहाण झाली हे कुणीच नाकारलेलं नाही. विधान भवनासारख्या कायदेमंडळात असं कृत्य करून आमदारांनी लोकशाहीचे धिंडवडे काढले. या प्रकरणी चौकशीनंतर कारवाई होईलही, पण लोकशाहीचं मंदिर असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला आमदारांनी काळीमा फासलाय ही बाब दुर्लक्ष न करण्यासारखी आहे.

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
www.24taas.com, दीपक भातुसे

एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. याप्रकरणी कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर एपीआय सूर्यंवशींना मारहाण केली नाही, मात्र त्यांची वागणूक अरेरावीची असल्याचा दावा आरोप असणा-या आमदारांनी केलाय. या आमदारांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

विधान भवन परिसरात एपीआय सचिन सूर्यवंशी यांची मारहाणीनंतर त्यांना थेट स्ट्रेचरवरुनच हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. विशेष म्हणजे कायदेमंडळात कायदा तयार करणा-या आमदारांनीच त्यांची ही अशी अवस्था केली.. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी टोलनाक्यावर झालेल्या वादानंतर विधानभवनात हा राडा झाला.. सूर्यवंशींविरोधात हक्क्भंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. त्यानंतर विधानभवनात क्षितीज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.. आणि त्यानंतर काही आमदारांनी घेरुन सूर्यवंशींची वाईट अवस्था केली.

विधान भवनाच्या मर्यादेलाच न शोभणारं हे कृत्य घडल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली.. यानंतर संतप्त झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी थेट विधानभवन गाठलं. पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आणि हिमांशू रॉय यांनी या मारहाणप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत खेद व्यक्त करत, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. तर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाचा निषेध करत, दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं.
दोषी आमदारांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी मारहाणीचे आरोप असलेल्या आमदारांनी एपीआय सूर्यवंशीच अरेरावी करत असल्याचं सांगत त्याचे पुरावे म्हणून सीडीही माध्यमांना दिली. क्षितीज ठाकूर यांनी झालेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत, दोषी आढळल्यास राजीनामा देईन अशी भूमिका घेतली. राम कदमांनी तर आपल्यालाच मारहाण झाल्याचा दावा केला.

आमदारांनी ते आम्ही नव्हेच अशी भूमिका घेतली असली तरी एपीआय सूर्यवंशींना मारहाण झाली हे कुणीच नाकारलेलं नाही. विधान भवनासारख्या कायदेमंडळात असं कृत्य करून आमदारांनी लोकशाहीचे धिंडवडे काढले. या प्रकरणी चौकशीनंतर कारवाई होईलही, पण लोकशाहीचं मंदिर असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला आमदारांनी काळीमा फासलाय ही बाब दुर्लक्ष न करण्यासारखी आहे.

10/14

राम कदमांनी केली मारायला सुरुवात – सूर्यवंशीwww.24taas.com, मुंबई एपीआय सचिन सूर्यवंशींना आमदारांनी मारहाण केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. विधानभवनातच त्यांना ही मारहाण करण्यात आल्यानं, मोठी खळबळ उडालीय. मारहाणीचा आरोप असणाऱ्या आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. मात्र प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.‘राम कदमांनी मारायला पहिली सुरूवात केली... त्यांनी डोक्यावर मारलंय... एक जण इथं नरड्यावर उभा राहिला होता.... फुटेज बघितलं तर त्यामध्ये सगळं लक्षात येईल... माझी पहिलीही कारवाई चूक नव्हती... आणि आताचीही नाही... पण, आपल्या बाजुने कोण आहे, त्यामुळे काहीही होऊ शकतं’ असं जबाब सचिन सूर्यवंशी यांनी दिलाय. तर, `मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो` असं स्पष्टीकरण मंगळवारी राम कदम यांनी दिलं होतं.

राम कदमांनी केली मारायला सुरुवात – सूर्यवंशी
www.24taas.com, मुंबई

एपीआय सचिन सूर्यवंशींना आमदारांनी मारहाण केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. विधानभवनातच त्यांना ही मारहाण करण्यात आल्यानं, मोठी खळबळ उडालीय. मारहाणीचा आरोप असणाऱ्या आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. मात्र प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIVE फुटेज ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय.
‘राम कदमांनी मारायला पहिली सुरूवात केली... त्यांनी डोक्यावर मारलंय... एक जण इथं नरड्यावर उभा राहिला होता.... फुटेज बघितलं तर त्यामध्ये सगळं लक्षात येईल... माझी पहिलीही कारवाई चूक नव्हती... आणि आताचीही नाही... पण, आपल्या बाजुने कोण आहे, त्यामुळे काहीही होऊ शकतं’ असं जबाब सचिन सूर्यवंशी यांनी दिलाय.

तर, `मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो` असं स्पष्टीकरण मंगळवारी राम कदम यांनी दिलं होतं.

11/14

राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?www.24taas.com, मुंबई‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.’ असं खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांवर सीएसटी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्याच्या वेळेस म्हटंले होते. आज विधीमंडळ परिसरातच पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी केलेल्या माराहाणीवर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीमध्ये मनसे आमदार राम कदम ह्यांच्यावर देखील आरोप ठेवण्यात आली आहे. मनसे आमदार राम कदम यांच्यावर आरोप झाल्याने राज ठाकरे यांनी पोलीसांवर हात उचलू नका या गोष्टीचा मात्र विसर पडला असावा असेच दिसून येते.  आमदारांच्या कृतीने राज ठाकरेही संतप्त झाले आहेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारानं असं कृत्य केलं असेल, तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?

www.24taas.com, मुंबई

‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.’ असं खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांवर सीएसटी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्च्याच्या वेळेस म्हटंले होते. आज विधीमंडळ परिसरातच पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना आमदारांनी केलेल्या माराहाणीवर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीमध्ये मनसे आमदार राम कदम ह्यांच्यावर देखील आरोप ठेवण्यात आली आहे. मनसे आमदार राम कदम यांच्यावर आरोप झाल्याने राज ठाकरे यांनी पोलीसांवर हात उचलू नका या गोष्टीचा मात्र विसर पडला असावा असेच दिसून येते.

आमदारांच्या कृतीने राज ठाकरेही संतप्त झाले आहेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारानं असं कृत्य केलं असेल, तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

12/14

पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदाwww.24taas.com,मुंबईआमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.मनसे आमदार राम कदम यांना मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी नोटीसही बजावली आहे. मनसे कार्यालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, यासाठी कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. आता राम कदम यांच्यावर मनसे काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.	राम कदम हे मनसेच्या सातव्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत मनसेतून नाराजी होती. त्यातच राम कुठेही दिसत नाही, अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता ऑनड्युटी पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नाव राम कदमांमुळे आल्याने आमदार कदम यांच्यावर कारवाई होणार, याचे स्पष्ट संकेत मनसेकडून मिळाले आहेत.

पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा
www.24taas.com,मुंबई

आमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.

मनसे आमदार राम कदम यांना मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी नोटीसही बजावली आहे. मनसे कार्यालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, यासाठी कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. आता राम कदम यांच्यावर मनसे काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
राम कदम हे मनसेच्या सातव्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत मनसेतून नाराजी होती. त्यातच राम कुठेही दिसत नाही, अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता ऑनड्युटी पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नाव राम कदमांमुळे आल्याने आमदार कदम यांच्यावर कारवाई होणार, याचे स्पष्ट संकेत मनसेकडून मिळाले आहेत.

13/14

पोलीस मारहाणीने राज ठाकरे झाले संतप्तwww.24taas.com,मुंबईआमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे. पोलिसांवर कोणी हात उगारू नयेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारांने असं कृत्य केलं असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी, असंही राज ठाकरे म्हणालेत.मनसे आमदार राम कदम यांनीही या पोलिसाला मारहाण केली आहे. त्यामुळे मनसेचे गटनेत बाळा नांदगावकर यांनी राम कदम यांना नोटीसही बजावली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. त्याच राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.सेवा बजावणाऱ्या पोलिसाला सर्वपक्षीय आमदारांनी चोप दिल्याने याचे पडसाद विधानसभेत उमटलेत. त्यामुळे विधानसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आले आहे. आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह भाजपचे रावत यांचाही मारहणीत हात असल्याने आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस मारहाणीने राज ठाकरे झाले संतप्त
www.24taas.com,मुंबई

आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे.

पोलिसांवर कोणी हात उगारू नयेत. पोलिसांवर कुठेही हात उचलणं गैरच आहे. मनसे आमदारांने असं कृत्य केलं असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी, असंही राज ठाकरे म्हणालेत.
मनसे आमदार राम कदम यांनीही या पोलिसाला मारहाण केली आहे. त्यामुळे मनसेचे गटनेत बाळा नांदगावकर यांनी राम कदम यांना नोटीसही बजावली आहे. पोलीस मारहाणीमध्ये मनसे आमदार असल्याने मनसेही अडचणीत सापडली आहे. त्याच राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.

सेवा बजावणाऱ्या पोलिसाला सर्वपक्षीय आमदारांनी चोप दिल्याने याचे पडसाद विधानसभेत उमटलेत. त्यामुळे विधानसभेचं कामकाजही तहकूब करण्यात आले आहे. आमदार क्षितिज ठाकूर, मनसे आमदार राम कदम यांच्यासह भाजपचे रावत यांचाही मारहणीत हात असल्याने आता काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

14/14

विधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाणwww.24taas.com, मुंबईँआमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. विधीमडंळात आवारातच पोलीस निरिक्षकाला मारहाण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आमदारांनी पोलीस निरिक्षकाला मारहाण केल्याचे समजते आहे. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपावरून सचिन सूर्यवंशी यांच्यावर थोड्यावेळापूर्वी हक्कभंग दाखल करण्यात आला होता. विधिमंडळ आवारातच आमदार क्षितिज ठाकूर यांनी सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केली. यामध्ये इतर तीन आमदारांनीही सूर्यवंशींना मारहाण केली असल्याचं समजते आहे.

विधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
www.24taas.com, मुंबईँ

आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

विधीमडंळात आवारातच पोलीस निरिक्षकाला मारहाण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आमदारांनी पोलीस निरिक्षकाला मारहाण केल्याचे समजते आहे. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपावरून सचिन सूर्यवंशी यांच्यावर थोड्यावेळापूर्वी हक्कभंग दाखल करण्यात आला होता.

विधिमंडळ आवारातच आमदार क्षितिज ठाकूर यांनी सचिन सुर्यवंशी यांना मारहाण केली. यामध्ये इतर तीन आमदारांनीही सूर्यवंशींना मारहाण केली असल्याचं समजते आहे.