दखल बाळासाहेबांची

Nov 18, 2012, 06:17 AM IST
1/2

ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसीमहाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. बाळ ठाकरे यांचा प्रवास हा कार्टुनिस्टपासून झाला. त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तरी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही तसेच कोणतेही पद स्वीकारले नाही. तरीही त्यांचा राजकारणावर प्रभाव होता. खासकरून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने म्हटले आहे.बाळ ठाकरे हे एक चांगले वक्ते होते. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे ते लोकप्रिय होते. त्यांची भाषणे युवकांवर मोहीनी घालीत होती. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे मुंबईत निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मध्येच त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त आले होते मात्र, शनिवारी ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.महाराष्ट्र राजकारणात दशकापासून त्यांचा दबदबा राहिला होता. त्यांच्या निधनानंतर मुंबई कडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रात्री भाजप नेत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. हा भोजनाचा बेत रद्द करण्यात आल्याची माहिती बीबीसीने आपल्या वृत्तात दिली आहे.

ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक - बीबीसी
महाराष्ट्र राजकारणात दशकापासून बाळ ठाकरे यांचा दबदबा होता. ठाकरे हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते, त्यांचा महाराष्ट्राबरोबच खास करून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

बाळ ठाकरे यांचा प्रवास हा कार्टुनिस्टपासून झाला. त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तरी त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही तसेच कोणतेही पद स्वीकारले नाही. तरीही त्यांचा राजकारणावर प्रभाव होता. खासकरून मुंबईवर मोठा प्रभाव होता, असे बीबीसीने म्हटले आहे.

बाळ ठाकरे हे एक चांगले वक्ते होते. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे ते लोकप्रिय होते. त्यांची भाषणे युवकांवर मोहीनी घालीत होती. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे मुंबईत निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मध्येच त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त आले होते मात्र, शनिवारी ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्र राजकारणात दशकापासून त्यांचा दबदबा राहिला होता. त्यांच्या निधनानंतर मुंबई कडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर रविवारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रात्री भाजप नेत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. हा भोजनाचा बेत रद्द करण्यात आल्याची माहिती बीबीसीने आपल्या वृत्तात दिली आहे.

2/2

बाळासाहेबांची पाकिस्तानमधील वृत्तपत्रांकडून दखलबाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.‘डॉन’ या आघाडीच्या पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे श्नसनाच्या विकाराने निधन झाल्याचे म्हटले आहे.भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराच्या राजकरणावर गेल्या दोन दशकाहून अधिक काळ ठाकरे यांचे वर्चस्व राहिल्याचे डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या अनेक टप्यांवर बदललेल्या भूमिकेचा मागोवाही डॉनने घेतला आहे.ठाकरे सार्वजनिक आयुष्य भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी वेचले. मुंबईवर आणि मुंबईतील नोक-यांवर मराठी माणसाचा पहिला हक्क तसेच त्यांच्या हिंदुत्वाबद्दलचे विचारही या वृत्तात मांडण्यात आले आहेत.

बाळासाहेबांची पाकिस्तानमधील वृत्तपत्रांकडून दखल
बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.

‘डॉन’ या आघाडीच्या पाकिस्तानी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे श्नसनाच्या विकाराने निधन झाल्याचे म्हटले आहे.

भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराच्या राजकरणावर गेल्या दोन दशकाहून अधिक काळ ठाकरे यांचे वर्चस्व राहिल्याचे डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या अनेक टप्यांवर बदललेल्या भूमिकेचा मागोवाही डॉनने घेतला आहे.

ठाकरे सार्वजनिक आयुष्य भूमिपुत्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी वेचले. मुंबईवर आणि मुंबईतील नोक-यांवर मराठी माणसाचा पहिला हक्क तसेच त्यांच्या हिंदुत्वाबद्दलचे विचारही या वृत्तात मांडण्यात आले आहेत.