होम लोन घेतल्यानंतर बेरोजगारीची वेळ आली तर...

Aug 11, 2015, 11:52 AM IST
1/7

सरळ बँकेशी संवाद साधा
तुमच्या ईएमआयला काही कालावधीसाठी रोखण्याचा किंवा रिफायनान्सिंगचा पर्याय देण्याचा अधिकार बँकेकडे असतो. गरजेच्या वेळी तुम्ही बँकेशी संवाद साधला तर तुम्हाला ईएमआय भरण्यासाठीचा अवधी वाढवून मिळू शकतो. 

2/7

पीएफ (प्रोव्हिडंट फंड)
तुम्ही जॉब करत असताना जमा झालेला पीएफ किंवा याशिवाय तुम्ही स्वत: पीएफ खात्यात केलेली गुंतवणूक तुमचा ईएमआय भरण्यासाठी यावेळी तुम्हाला महत्त्वाची ठरू शकते. बऱ्याचदा अशा गुंतवणुकीला हात लावण्यास लोक कचरतात... कारण रिटायरमेंटसाठी केलेली ही तरतूद असते. पण, गरज लागलीच तर या पर्यायाचाही तुम्ही वापर करू शकाल. 

जर तुम्ही पाच वर्ष नोकरी केली असेल तर पीएफची रक्कम काढल्यानंतर त्यावर कोणत्याही पद्धतीचा कर भरावा लागत नाही. पण, पुन्हा दुसरी नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला नवं पीएफ अकाऊंट उघडावं लागेल. 

पीएफ (प्रोव्हिडंट फंड)
तुम्ही जॉब करत असताना जमा झालेला पीएफ किंवा याशिवाय तुम्ही स्वत: पीएफ खात्यात केलेली गुंतवणूक तुमचा ईएमआय भरण्यासाठी यावेळी तुम्हाला महत्त्वाची ठरू शकते. बऱ्याचदा अशा गुंतवणुकीला हात लावण्यास लोक कचरतात... कारण रिटायरमेंटसाठी केलेली ही तरतूद असते. पण, गरज लागलीच तर या पर्यायाचाही तुम्ही वापर करू शकाल.  जर तुम्ही पाच वर्ष नोकरी केली असेल तर पीएफची रक्कम काढल्यानंतर त्यावर कोणत्याही पद्धतीचा कर भरावा लागत नाही. पण, पुन्हा दुसरी नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला नवं पीएफ अकाऊंट उघडावं लागेल. 

3/7

इन्शुरन्स स्कीम
बाजारात अनेक होम लोन इन्शुरन्स प्लान उपलब्ध आहेत. तसंच तुमच्या इतर इन्शुरन्स स्कीममध्ये बचतीचाही पर्याय उपलब्ध असतो. अशा इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला खूप कमी रिटर्न्स देत असल्या तरी कर्ज घेण्यासाठी त्या मदत करतात. 

4/7

फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युचुअल फंड
तुमच्याकडे इमर्जन्सी फंड शिल्लक नसेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युचुअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला उपयोगी ठरू शकते.

फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युचुअल फंड
तुमच्याकडे इमर्जन्सी फंड शिल्लक नसेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युचुअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला उपयोगी ठरू शकते.

5/7

इमर्जन्सी फंड आणि गुंतवणूक
आर्थिक सुस्थितीत असताना तुम्ही टाकलेली शिल्लक रक्कम तुम्हाला यातून दिलासा देऊ शकते. वित्तीय सल्लागारांच्या मते, तुमच्या मासिक पगाराच्या सहा पट रक्कम तुमची इमर्जन्सी फंड म्हणून बँकेत बाकी असायला हवी. ही रक्कम तुम्हाला बेरोजगारीच्या काळात कुणाकडे पैसे मागण्याची वेळ आणणार नाही.

6/7

डिफॉल्टर लिस्टमध्ये नाव नको... 
या काही पर्यायांचा विचार अगोदरच केला गेला तर नोकरी गेल्यानंतरही काही काळ डोकं शांत ठेऊन तुम्ही पुन्हा आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करू शकाल.

बँकेचे हफ्ते वेळच्या वेळी भरले गेले नाही तर अशावेळी तुमचं नाव डिफॉल्टर यादीत दिसू शकतं. सलग तीन महिने ईएमआय डिफॉल्ट झाला तर बँक तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. यामुळे क्रेडिट रेटिंगलाही नुकसान होतं. 

डिफॉल्टर लिस्टमध्ये नाव नको... 
या काही पर्यायांचा विचार अगोदरच केला गेला तर नोकरी गेल्यानंतरही काही काळ डोकं शांत ठेऊन तुम्ही पुन्हा आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करू शकाल. बँकेचे हफ्ते वेळच्या वेळी भरले गेले नाही तर अशावेळी तुमचं नाव डिफॉल्टर यादीत दिसू शकतं. सलग तीन महिने ईएमआय डिफॉल्ट झाला तर बँक तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. यामुळे क्रेडिट रेटिंगलाही नुकसान होतं. 

7/7

तुम्ही जर जास्त कालावधीची कर्ज घेतली असतील तर ती फिटेपर्यंत तुमच्या डोक्यावर कर्जाच ओझं कायम राहतं. यावेळी, व्यक्तीवर मोठा मानसिक दबावही दिसून येतो... आणि अशा वेळी अस्थिर वातावरणात तुमची नोकरी गेली तर???

हा विचारही अंगावर काटा उभा करतो ना! पण, काही पूर्व काळजी घेतली तर हा ताण तुम्हाला तितक्या मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही.

तुम्ही जर जास्त कालावधीची कर्ज घेतली असतील तर ती फिटेपर्यंत तुमच्या डोक्यावर कर्जाच ओझं कायम राहतं. यावेळी, व्यक्तीवर मोठा मानसिक दबावही दिसून येतो... आणि अशा वेळी अस्थिर वातावरणात तुमची नोकरी गेली तर??? हा विचारही अंगावर काटा उभा करतो ना! पण, काही पूर्व काळजी घेतली तर हा ताण तुम्हाला तितक्या मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही.