बॉलीवूडचे हिरो... अभ्यासात झिरो

Jul 17, 2013, 11:32 AM IST
1/16

बिपाशा बासूबिपाशा तर फक्त बारावी पास आहे. तिला सीए बनायचे होते, त्याचवेळी मॉडेलिंगसाठी तिला ऑफर येऊ लागल्या आणि तिने शिक्षण सोडून दिले.

बिपाशा बासू
बिपाशा तर फक्त बारावी पास आहे. तिला सीए बनायचे होते, त्याचवेळी मॉडेलिंगसाठी तिला ऑफर येऊ लागल्या आणि तिने शिक्षण सोडून दिले.

2/16

आमिर खानबॉलीवूडमध्ये `मिस्टर परफेक्शनिस्ट` म्हणून ओळखला जाणारा अमिर खान अभ्यासाच्या बाबतीत सलमानसारखाच आहे. आमिर कसाबसा बारावी पास झाला.त्यानंतर त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि काका नासिर हुसैन यांचा असिस्टंट म्हणून काम पाहू लागला.

आमिर खान
बॉलीवूडमध्ये `मिस्टर परफेक्शनिस्ट` म्हणून ओळखला जाणारा अमिर खान अभ्यासाच्या बाबतीत सलमानसारखाच आहे. आमिर कसाबसा बारावी पास झाला.

त्यानंतर त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि काका नासिर हुसैन यांचा असिस्टंट म्हणून काम पाहू लागला.

3/16

कंगना राणावतकंगनाला लहानपणापासूनच डॉक्टर बनायची इच्छा होती. डेहराडून इथं शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवण्यात आलं.दिल्लीत कॉलेजला जाण्याऐवजी तिनं मॉडेलिंगच्या शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर ती चित्रपटात आली. ती ही दहावी पास आहे.

कंगना राणावत
कंगनाला लहानपणापासूनच डॉक्टर बनायची इच्छा होती. डेहराडून इथं शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवण्यात आलं.

दिल्लीत कॉलेजला जाण्याऐवजी तिनं मॉडेलिंगच्या शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर ती चित्रपटात आली. ती ही दहावी पास आहे.

4/16

रणबीर कपूरकपूर घराण्यात सर्वात जास्त शिकलेला मुलगा म्हणजे रणबीर कपूर... पण तरीही रणबीरही ग्रॅज्युएट नाही.एचआर या कॉलेजमध्ये दोन वर्ष टाईमपास केल्यानंतर रणबीरला अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी न्यू यॉर्कला पाठवण्यात आलं होतं

रणबीर कपूर
कपूर घराण्यात सर्वात जास्त शिकलेला मुलगा म्हणजे रणबीर कपूर... पण तरीही रणबीरही ग्रॅज्युएट नाही.

एचआर या कॉलेजमध्ये दोन वर्ष टाईमपास केल्यानंतर रणबीरला अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी न्यू यॉर्कला पाठवण्यात आलं होतं

5/16

प्रियांका चोप्राप्रियांका चोप्राला तर सॉफ्टवेअर इंजीनिअर बनायचे होते पण `मिस वर्ल्ड` हा खिताब जिंकल्यानंतर चित्रपट सृष्टीकडून तिला बोलावणे आले. तिने  लखनऊ, बरेली आणि अमेरिकेत आपलं हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलंय. मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये तिने प्रवेश तर घेतला होता मात्र ती पुढे शिक्षण घेऊ शकली नाही.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्राला तर सॉफ्टवेअर इंजीनिअर बनायचे होते पण `मिस वर्ल्ड` हा खिताब जिंकल्यानंतर चित्रपट सृष्टीकडून तिला बोलावणे आले. तिने लखनऊ, बरेली आणि अमेरिकेत आपलं हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलंय.

मुंबईच्या जयहिंद कॉलेजमध्ये तिने प्रवेश तर घेतला होता मात्र ती पुढे शिक्षण घेऊ शकली नाही.

6/16

परिणीता चोप्राही पण ग्रॅज्युएट नाहीये. परंतु तिने प्रोफेशनल डिप्लोमा केलाय. अंबालाच्या ‘कॉन्व्हेंट ऑफ़ जीझस अॅन्ड मेरी स्कूल’मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ती लंडनमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये दाखल झाली आणि नंतर   यशराज फ़िल्म्स’च्या मार्केटिंग व पीआर कन्सल्टंटची नोकरी तिला मिळाली. तिथेच तिला ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधीही मिळाली.

परिणीता चोप्रा
ही पण ग्रॅज्युएट नाहीये. परंतु तिने प्रोफेशनल डिप्लोमा केलाय. अंबालाच्या ‘कॉन्व्हेंट ऑफ़ जीझस अॅन्ड मेरी स्कूल’मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ती लंडनमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये दाखल झाली आणि नंतर यशराज फ़िल्म्स’च्या मार्केटिंग व पीआर कन्सल्टंटची नोकरी तिला मिळाली. तिथेच तिला ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधीही मिळाली.

7/16

अक्षय कुमारअक्षयनं मुंबईच्या `डॉन बॉस्को` शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केलं.  त्यानंतर त्याने खालसा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. मात्र त्याची खरी आवड खेळात होती. कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून तो मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला निघून गेला.

अक्षय कुमार
अक्षयनं मुंबईच्या `डॉन बॉस्को` शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने खालसा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं.

मात्र त्याची खरी आवड खेळात होती. कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून तो मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला निघून गेला.

8/16

सैफ अली खाननवाब सैफकडे कोणतीही पदवी नाही. इंग्लंडमधील लॉकर्स पार्क शाळेनंतर विंचेस्टर कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून तो दिल्लीला निघून आला. त्याची हिरो बनण्य़ाची इच्छा पाहून आई शर्मिला टागोर यांनी त्याला मुंबईमध्ये गुलजार यांच्याकडे पाठवले.

सैफ अली खान
नवाब सैफकडे कोणतीही पदवी नाही. इंग्लंडमधील लॉकर्स पार्क शाळेनंतर विंचेस्टर कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून तो दिल्लीला निघून आला.

त्याची हिरो बनण्य़ाची इच्छा पाहून आई शर्मिला टागोर यांनी त्याला मुंबईमध्ये गुलजार यांच्याकडे पाठवले.

9/16

इम्रान खानमुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश शाळा सोडल्यानंतर इमरान सेंट झेवियर्समध्ये दाखल झाला. इथेच त्याची ओळख अवंतिकाशी म्हणजेच त्याच्या पत्नीशी झाली होती.

इम्रान खान
मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश शाळा सोडल्यानंतर इमरान सेंट झेवियर्समध्ये दाखल झाला. इथेच त्याची ओळख अवंतिकाशी म्हणजेच त्याच्या पत्नीशी झाली होती.

10/16

अभिषेक बच्चन`बीग बी` अमिताभ बच्चन यांनी दोन दोन पदव्या मिळवल्या असल्या तरी त्यांचा मुलानं अभिषेकनं मात्र ग्रॅज्युएशनही पूर्ण केलेलं नाही.मॉडर्न स्कूल (दिल्ली), बॉम्बे स्कॉटिश स्कूल (मुंबई) आणि  एग्लोन कॉलेज (स्वित्झर्लंड) मध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले खरे मात्र तेथील शिक्षण अर्धवट सोडून तो मुंबईला हिरो बनण्यासाठी निघून आला.

अभिषेक बच्चन
`बीग बी` अमिताभ बच्चन यांनी दोन दोन पदव्या मिळवल्या असल्या तरी त्यांचा मुलानं अभिषेकनं मात्र ग्रॅज्युएशनही पूर्ण केलेलं नाही.

मॉडर्न स्कूल (दिल्ली), बॉम्बे स्कॉटिश स्कूल (मुंबई) आणि एग्लोन कॉलेज (स्वित्झर्लंड) मध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले खरे मात्र तेथील शिक्षण अर्धवट सोडून तो मुंबईला हिरो बनण्यासाठी निघून आला.

11/16

सलमान खानबॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान फक्त दहावी पास आहे. दहावीनंतर त्याने वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये अॅडमिशन तर घेतलं पण परीक्षाच दिली नाही तर तो पास कसा होणार?

सलमान खान
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान फक्त दहावी पास आहे. दहावीनंतर त्याने वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये अॅडमिशन तर घेतलं पण परीक्षाच दिली नाही तर तो पास कसा होणार?

12/16

अनुष्का शर्माबंगलोरमध्ये माउंट कार्मल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिने फॅशन शो आणि प्रोड्क्टसाठी म़ॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आणि ग्रॅज्युएशनचा अभ्यास अर्धवट सोडला. अनुष्काला पत्रकारितेची पदवी घ्यायची होती. पण ‘रब ने बना दी जोडी’मध्ये अॅक्टींगसाठी संधी मिळाल्याने तिनंही शिक्षण अर्ध्यावरच सोडलं.

अनुष्का शर्मा
बंगलोरमध्ये माउंट कार्मल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिने फॅशन शो आणि प्रोड्क्टसाठी म़ॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आणि ग्रॅज्युएशनचा अभ्यास अर्धवट सोडला.

अनुष्काला पत्रकारितेची पदवी घ्यायची होती. पण ‘रब ने बना दी जोडी’मध्ये अॅक्टींगसाठी संधी मिळाल्याने तिनंही शिक्षण अर्ध्यावरच सोडलं.

13/16

करिश्मा कपूर१९९०च्या दशकातील सगळ्यात टॉपची अभिनेत्री करिश्मा कपूर तर फक्त पाचवी  पास आहे. सहावीत जाण्याआधी तिनं  अभ्यासाला रामराम ठोकला आणि १७व्या वर्षातच तिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाने अभिनयाला सुरुवात केली.

करिश्मा कपूर
१९९०च्या दशकातील सगळ्यात टॉपची अभिनेत्री करिश्मा कपूर तर फक्त पाचवी पास आहे. सहावीत जाण्याआधी तिनं अभ्यासाला रामराम ठोकला आणि १७व्या वर्षातच तिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाने अभिनयाला सुरुवात केली.

14/16

ऐश्वर्या राय-बच्चनअॅशनं जयहिंद कॉलेजमधून एका वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्चरच्या अभ्यासाठी रहेजा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली खरी, पण त्यानंतर मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये बिझी झाल्याने तिनं कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून दिलं. त्यामुळे साहजिकच तीही अंडर ग्रज्युएट आहे.

ऐश्वर्या राय-बच्चन
अॅशनं जयहिंद कॉलेजमधून एका वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्चरच्या अभ्यासाठी रहेजा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली खरी, पण त्यानंतर मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये बिझी झाल्याने तिनं कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून दिलं. त्यामुळे साहजिकच तीही अंडर ग्रज्युएट आहे.

15/16

कतरिना कैफलंडनमध्ये राहण्याच्या आधी कतरिना आपल्या कुटुंबीयांसोबत चीन, जपान, फ्रान्स,  स्वित्झर्लंड, पोलंड, जर्मनी,  बेल्जियम यांसारख्या अनेक देशांमधून सतत फिरतीवर राहिलीय. त्यामुळे पुस्तकी अभ्यास तिला घरीच देण्यात आला.लंडनमध्ये तीन वर्षाच्या वास्तव्यादरम्यान तिने मॉडेलिंग सुरु केलं आणि भारतात येऊन तिने बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला. त्यामुळे ती बॉलीवूडची स्टार असली तरी अभ्यासात मात्र झिरो आहे.

कतरिना कैफ
लंडनमध्ये राहण्याच्या आधी कतरिना आपल्या कुटुंबीयांसोबत चीन, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, जर्मनी, बेल्जियम यांसारख्या अनेक देशांमधून सतत फिरतीवर राहिलीय. त्यामुळे पुस्तकी अभ्यास तिला घरीच देण्यात आला.

लंडनमध्ये तीन वर्षाच्या वास्तव्यादरम्यान तिने मॉडेलिंग सुरु केलं आणि भारतात येऊन तिने बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला. त्यामुळे ती बॉलीवूडची स्टार असली तरी अभ्यासात मात्र झिरो आहे.

16/16

कतरिना शाळेतच गेली नाही तर `दबंग` दहावी पासतुमचे आवडते बॉलीवूड स्टार जरी चित्रपटसृष्टीतील तारे असले तरी अभ्यासाच्या दुनियेत हे नेहमीच मागे राहिलेत.... तुमचे आवडते स्टार फक्त दहावी बारावीपर्यंतच शिकलेत. पाहुयात असेच काही स्टार्स...`बार्बी गर्ल` समजली जाणारी कतरिना कधी शाळेतच गेलेली नाहीय. तर हुशार आणि परफेक्शनिस्ट अमिर खान आणि दबंग हिरो सलमान खान यांनी कॉलेजचं तोंडदेखील पाहिलेलं नाही. तर करिश्मा कपूर तर फक्त पाचवी पास आहे.

कतरिना शाळेतच गेली नाही तर `दबंग` दहावी पास
तुमचे आवडते बॉलीवूड स्टार जरी चित्रपटसृष्टीतील तारे असले तरी अभ्यासाच्या दुनियेत हे नेहमीच मागे राहिलेत.... तुमचे आवडते स्टार फक्त दहावी बारावीपर्यंतच शिकलेत. पाहुयात असेच काही स्टार्स...

`बार्बी गर्ल` समजली जाणारी कतरिना कधी शाळेतच गेलेली नाहीय.

तर हुशार आणि परफेक्शनिस्ट अमिर खान आणि दबंग हिरो सलमान खान यांनी कॉलेजचं तोंडदेखील पाहिलेलं नाही. तर करिश्मा कपूर तर फक्त पाचवी पास आहे.