या दोन राशींसाठी सर्वात भाग्यशाली ठरेल २०१८ वर्ष

नवीन वर्ष लवकरच येणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या नव्या ऊर्जेसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की, येणारं वर्ष कसं जाणार. काय नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणार की, अडचणींचा सामना करावा लागणार....

Updated: Dec 28, 2017, 03:54 PM IST
या दोन राशींसाठी सर्वात भाग्यशाली ठरेल २०१८ वर्ष title=

मुंबई : नवीन वर्ष लवकरच येणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या नव्या ऊर्जेसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की, येणारं वर्ष कसं जाणार. काय नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणार की, अडचणींचा सामना करावा लागणार....

या २ राशी ठरणार सर्वात भाग्यशाली

नवीन वर्षात ग्रहांच्या दिशा परिवर्तनामुळे दोन राशींसाठी हे वर्ष सर्वात शुभ होणार आहे. शनीची दिशा बदलल्याने दोन इतर राशींना अनेक प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल....

ग्रह परिवर्तन

नव्या वर्षात २०१८ मध्ये काही महत्वपूर्ण ग्रह परिवर्तन होणार आहे. १७ जानेवारीला तुळ राशीतून निघून मंगळ वृश्चिक राशीमध्ये जाणार आहे. इथे ते ७ मार्चपर्यंत राहतील. त्यामुळे तीन महिन्यांचा हा कालावधी राशींसाठी महत्वपूर्ण मानला जाणार आहे. गुरू सुद्धा तुळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. याचाही प्रभाव सर्वच राशींवर पडणार आहे. 

आनंदाची बाब...

चांगली बाब ही आहे की, ग्रहांच्या या परिवर्तनाचा काही राशींवर खूपच सकारात्मक प्रभाव होणार आहे. खासकरून दोन राशींसाठी हे खूप फायद्याचं ठरणार आहे. असे मानले जात आहे की, नव्या वर्षाची सुरूवात या राशींसाठी समृद्धी घेऊन येणारी राहणार. आरोग्य, करिअर, प्रेम किंवा लग्न प्रत्येक बाबतीत यांच्यासाठी शुभ वेळ ठरणार आहे. 

कोणत्या दोन राशी?

यातील पहिली राशी मेष ही आहे. मंगळाची चाल मेष राशींच्या लोकांना लाभ देणार आहे. मंगळाची स्थिती या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देणार असेही मानले जात आहे. 

जे लोक ब-याच काळापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये, अशासाठी ही वेळ फायद्याची असणार आहे. करिअरबाबतही अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. अनेकांसाठी ही बाब टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 

मकर राशीसाठीही फायदा

मकर राशीसाठीही मंगळाची चाल शुभ ठरणार आहे. जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ हा काळ या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. यांनाही आर्थिक लाभ होणार असे मानले जात आहे. 

बिझनेसमधील लोकांसाठीही हा काळ अधिक फायद्याचा ठरेल. ते नव्या क्षेत्रात आपला विस्तार करू शकतील. नोकरीमध्येही अनेकांना प्रमोशन मिळू शकतं.

वृश्चिक राशीतून शनि बाहेर

शनि वृश्चिक राशीतून बाहेर आल्याने अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तुळ राशीत गेल्या काही वर्षांपासून शनी असल्याने परेशान लोकांना यावर्षीत दिलासा मिळणार आहे. या राशीतील लोकांना प्रमोशन आणि खाजगी आयुष्यात आनंद मिळेल. 

सिंह राशीतील लोकांच्या पर्सनल आयुष्यातील कलह आता संपणार आहे. नव्या वर्षाच्या मध्यापर्यंत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.