देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या 'हा' इशारा

Tears while Worshiping God: आपल्या मूर्तीची पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे ही सामान्य गोष्ट नाही. ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे.

Updated: Dec 29, 2023, 03:52 PM IST
देवाची आठवण काढल्यावर डोळ्यात पाणी येतं? समजून घ्या 'हा' इशारा title=

Tears while Worshiping God:  देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यात पाणी आलंय असं कधी झालंय का? देवाची स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का? आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात. पूजा करताना आपल्या बंद डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात असे अनेकवेळा तुम्हाला वाटले असेल. पण हे असे का होते? याचा विचार केलाय का? यामागचे कारण जाणून घेऊया. देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते? हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले असा अर्थ होतो का? असे प्रश्न आपल्या पडतात. शास्त्रानुसार, पूजेच्या वेळी ओले डोळे, तंद्री लागणे आणि जांभई येणे याला स्वत:चा अर्थ आहे. याचा अर्थ जाणून घेऊया.

आपल्या मूर्तीची पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे ही सामान्य गोष्ट नाही. ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रेमाशिवाय पूजा नाही असे म्हणतात.आपल्या देवतेवर प्रेम आणि समर्पण असल्याशिवाय आपल्याला आपल्या देवतेचा आशीर्वाद मिळू शकत नाही, असे शास्त्रात सांगितले आहे.

विचारांचे द्वंद्व 

शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना सदैव फलदायी ठरते आणि ती उपासना भगवंताला नेहमीच मान्य होते. एखाद्या व्यक्तीला पूजेच्या वेळी जांभई येऊ लागली किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दोन विचार येतात. प्रार्थनेवेळी अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात डोकावत असतात. विचारांचे द्वंद्व मनाला कधीच शांती मिळू देत नाही. संकटात असताना देवाची पूजा केली तर जांभई येऊ लागते किंवा झोप लागते, असे शास्त्रात सांगितले आहे. 

दैवी शक्तीची चिन्ह 

पूजा करताना एखाद्या व्यक्तीचे अश्रू ओघळले तर दैवी शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे, असे शास्त्रात म्हटले आहे. जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि उपासनेत गढून जाता, तेव्हा भगवंताच्या रूपाशी संबंध येतो आणि तुम्ही केलेली उपासना यशस्वी होते असे म्हणतात. यामुळे अश्रूंच्या स्वरुपात आपला आनंद बाहेर पडतो असे शास्त्र आणि पुराणात सांगितले आहे की 

नकारात्मकतेचे लक्षण

पूजेदरम्यान जांभई येणे किंवा झोप येणे हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल तर तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे, असे पुराणात सांगितले आहे. 

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)