Horoscope 8 March 2023 : घाई करुन नका अपघात होण्याची भिती; 'या' राशींसाठी दिवस धोकादायक

Horoscope 8 March 2023 : 8 मार्च हा दिवस काहीसा संकटांनी भरलेला असू शकतो. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नेमकं कोणत्या राशीच्या लोकांना होणार याचा त्रास जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य.  

Updated: Mar 7, 2023, 11:39 PM IST
Horoscope 8 March 2023 : घाई करुन नका अपघात होण्याची भिती; 'या' राशींसाठी दिवस धोकादायक  title=

Daily Horoscope 8 March 2023 : ग्रहांच्या स्थितीवरुन भविष्याचा अंदाज बांधला जातो. राशीभविष्यानुसार 8 मार्च हा  दिवस  काही राशीच्या लोकांसाठी  धोकादायक आहे. अपघात होण्याची देखील भिती आहे. यामुळे घाई करु नका विशेष खबरदारी घ्या. सर्व 12 राशींसाठी कसा आहे. 8 मार्च हा दिवस जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य. 

मेष (Aries)  

मेष राशीच्या लोकांनी अजिबात घाई गडबड करण्याचा प्रयत्न करु नये. वाहन अपघात होण्याची शक्यता आहे. आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. केळी हे फळ दान म्हणून द्या. शुभ रंग पिवळा. 

वृषभ (Taurus)

नातेवाईंना भेटण्याचा योग येवू शकतो. सकाळी थोडा गोंधळ उडेल. मात्र, दुपारनंतर चांगली वेळ येईल. कौटुंबिक जीवनात प्रेम, जिव्हाळा आणखी वाढू शकतो. तांदूळ दान म्हणून द्या. शुभ रंग निळा.

मिथुन (Gemini)

नोकरीच्या तसेच कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा अजिबात करु नका अडचणीत येवू शकता. घरी आलेल्या मित्रांशी प्रेमाने वागा.  कौंटुंबिक वाद संपुष्टात येतील. खिचडी दान म्हणून द्या. शुभ रंग गुलाबी.

कर्क (Cancer)

मानत कुणाबद्दलही वाईट विचार आणू नका. दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा निश्चित फायदा होईल. बाहेरचे अन्न खाणे टाळा.  साखर दान म्हणून द्या. शुभ रंग पांढरा.

सिंह (Leo)

व्यवसायाशी संबधीत महत्वाची कामे करुन घ्या. कोणाचेही मन दुखावेल असे वर्तन टाळा. घरात शुभ कार्य घडू शकते. गुळ दान म्हणून द्या. शुभ रंग लाल.

कन्या (Virgo)

व्यवसायात आर्थिक लाभ होईल. कुणाला पैसै उधार दिले असल्यास ते परत मिळतील. मनात नैराश्य येवू देऊ नका. अन्न दान केल्याचा निश्चित फायदा होईल. शुभ रंग मरून.

तूळ (Libra)

एखादी भेटवस्तू मिळू शकते. एखादा मोठा निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. एखादा निर्णय घेतल्यास त्या निर्णयावर ठाम राहा. भाज्यांचे दान कार. शुभ रंग निळा. 

वृश्चिक (Scorpio)

व्यवसायात यश मिळेल. घरी  आलेल्या पाहुण्यांशी वाद होईल. मात्र, तुम्ही हुज्जत घालू नका. घराच्या उत्तर दिशेला एखाद भांड पाण्याने भरुन टेवा. गोड पदार्थांचे दान करा. शुभ रंग लाल.

धनु (Sagittarius)

कौटुंबिक कलह टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.  पिवळे तांदूळ दान करा.  शुभ रंग नारंगी. 

मकर (Capricorn)

एखादी इच्छा मनात असल्यास ती इच्छा पूर्ती होण्यास वेळ लागू शकतो. नात्यात दूरावा असल्यास तो दूर होईल. आईचा तसेच आजीचा आशिर्वाद घ्या.  तूप दान करा. शुभ रंग गुलाबी

कुंभ (Aquarius)

घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. संध्याकाळपर्यंतचा काळ शुभ राहील. यामुळे महत्वाची कामे याच वेळेत उरकून घ्या. व्यापारात अडकलेला पैसे परत मिळतील. कपडे दान करा. शुभ रंग हिरवा. 

मीन (Pisces)

वेळेच्या आधीच घरातून निघा. नेहमीच्या प्रवासातही विलंब होऊ शकतो. गरजवंत नातेवाईकाला मदत करा. आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा. दही भाताचे दान करा. शुभ रंग मरून.