दर रविवारी हे उपाय कराच, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न

रविवारी काही विशिष्ट उपाय केल्यास श्री देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ती भक्तांवर धन धान्याचा वर्षाव करते. 

Updated: May 1, 2022, 12:08 PM IST
दर रविवारी हे उपाय कराच, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न title=

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक वार अर्थात आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेले असतात. जसे की सोमवार श्री शंकर, मंगळवार श्री महागणपती, त्याचप्रमाणे रविवारी सूर्याची पूजा केली जाते. तरीही या दिवशी धन, संपत्तीची देवता माता लक्ष्मी हिच्याही पूजेला महत्व असते.

रविवारी काही विशिष्ट उपाय केल्यास श्री देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ती भक्तांवर धन धान्याचा वर्षाव करते, असे मानले जाते. चला जाणून घेऊ या रविवारी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

रविवारी करण्याचे उपाय

- मुंग्यांना साखर खाऊ घालणे.

- सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चतुर्मुखी दिवा लावणे.

- संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावणे.

- संध्याकाळी शिवमंदिरात गौरी शंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करणे.

- संध्याकाळी पिंपळाच्या पानावर इच्छा लिहून वाहत्या पाण्यात टाकल्यास मनोकामना पूर्ण होते.

- सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘आदित्य हृदया श्रुत’ चे पठण करावे.

- सकाळी पूजाघरातील देवदेवतांची पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.

- तीन नवीन झाडू खरेदी करून देवीच्या मंदिरात ठेवा. पण, हे करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही ही काळजी घ्यावी.

- पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

- कोणतेही काम करताना अपयश येत असल्यास रविवारी झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईचे दूध उशाशी ठेऊन झोपावे. सकाळी देवीची पूजा करून दुधाचे सेवन करावे.

हे दहा उपाय दर रविवारी केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तुमच्या घर सुख, समृद्धी आणि संपत्ती लाभेल.

( विशेष सूचना : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. )