Dussehra 2022 : 'या' तीन गोष्टींचं गुप्तदान करा, दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी

दसऱ्याचा मुहूर्त तुमच्या आयुष्यावर करणार सुखाची उधळण, जाणून घ्या नेमकं काय दान केल्यानं होईल हा चमत्कार... 

Updated: Oct 3, 2022, 10:27 AM IST
Dussehra 2022 : 'या' तीन गोष्टींचं गुप्तदान करा, दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी  title=
Dussehra 2022 date time gupt daan vijayadashami will make you feel blessed

Dussehra 2022 : हिंदू धर्मात (Hindu Religon) दसऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच शुभकामांची सुरुवात केली जाते. असं म्हणतात की याच दिवशी देवीनं महिषासुराचा वध केला होता. असंही म्हटलं जातं की श्रीरामानं (Shri Ram) अहंकारी रावणाचा वधही याच दिवशी केला होता. अधर्मावर धर्माचा विजय... असं म्हणत या दिवशी रावम दहन करण्याचीही प्रथा आहे. 

शस्त्र, अस्त्र, वाहन इत्यादींची पूजा (Shastra puja) या दिवशी घरोघरी मांडण्यात येते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा या दिवशी पूजाअर्चा करण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी अशाही काही गोष्टी आहेत ज्याचं दान केल्यामुळं बरंच पुण्य कमवता येतं. 

दसरा म्हणजे शुभूशकुनाची उधळण, अशा या दिवशी 3 गोष्टींचं दान केल्यामुळं साक्षात लक्ष्मीही तुमच्यावर वरदहस्त ठेवू शकते. अशी मान्यता आहे, की दसऱ्याच्या दिवशी झाडू दान केल्यामुळं घरात सुख- समृद्धी नांदते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर अन्न, जल आणि कपड्यांचं दान केल्यामुळं कायम लक्ष्मीची कृपा राहते. आर्थिक चणचण भासत नाही. 

अधिक वाचा : Navratri नंतर तुम्हाला असे स्वप्न दिसल्यास समजून घ्या दुर्गेची होणार कृपा

आणखी एक काम देईल यश... 
दसऱ्याच्या दिवशी सोनं, चांदी, नवं वाहन (Gold, Silver, Car) किंवा एखादी मौल्यवान गोष्ट खरेदी केल्यास ते अतिशय शुभ ठरतं. असं केल्यास पुढचं वर्षभर कुटुंबात आनंद वावरतो. या शुभ दिवशी तुम्लाहा नीलकंठ पक्षी दिसल्यास हा शुभशकुन समजावा.