Navratri नंतर तुम्हाला असे स्वप्न दिसल्यास समजून घ्या दुर्गेची होणार कृपा

'या' नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसात भक्तांच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं.  

Updated: Oct 3, 2022, 08:07 AM IST
Navratri नंतर तुम्हाला असे स्वप्न दिसल्यास समजून घ्या दुर्गेची होणार कृपा  title=

Navratri Dream Interpretation:  अखेर दोन वर्षांनंतर प्रत्येक जण मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी करत आहे. प्रत्येक भक्ताला नकवरात्रीची प्रतीक्षा असते. या नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. (Which Durga mantra is powerful?) या दिवसात भक्तांच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. नवरात्रीनंतर स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर समजून लवकरच दुर्गेची कृपा तुमच्यावर होणार आहे. तर जाणून घेवू नवरात्रीनंतर कोणत्या गोष्टी स्वप्नात दिसल्या तर काय होईल. (grace of Durga)
  
- नवरात्रीचा नववा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी तुम्हाला स्वप्नात घुबड दिसले तर समजून घ्या की तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमच्या घरात धन-पैशाचे मार्ग खुले होणार आहेत. नवरात्रीनंतर स्वप्नात घुबड दिसणे यशाचे लक्षण मानले जाते. (Navratri Shardiya)
 
- नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला स्वप्नात नारळ, कमळाचे फूल दिसले तर समजून घ्या की आई अंबेची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. कमळाचे फूल सरस्वतीशी संबंधित आहे. सरस्वतीला विद्येची देवी म्हटले जाते, म्हणून स्वप्नात कमळ पाहणे शुभ मानले जाते. (Navratri Shardiya)

- हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी स्वप्नात गाय दिसणे खूप शुभ मानलं जातं. या दरम्यान घरातून किंवा मंदिरातून बाहेर पडताना जर तुम्हाला गाय दिसली तर समजून घ्या लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. (Dream Interpretation)

- नवरात्रीनंतर स्वप्नात जमीन, तलाव किंवा समुद्र पार करून अग्नीची पूजा होताना दिसली असेल तर तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी खास होणार आहे. (Dream Interpretation)

- जर तुम्हाला स्वप्नात ब्राह्मण किंवा राजा दिसला तर ते खूप शुभ संकेत आहेत. यासोबत सिंह, गाय किंवा हत्तीचे दूध काढतानाचे दृश्य दिसले तर हे देखील खूप शुभ लक्षण आहे. (Durga Puja)

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)