Guru Chandal Yoga: काल सर्प दोषापेक्षाही धोकादायक 'गुरु चांडाल योग', यापासून दूर राहण्याचे हे उपाय

Guru Chandal Yoga in Marathi : कुंडलीत काल सर्प दोष असण्याने ज्याप्रमाणे अनेक त्रास होतात, त्याचप्रमाणे कुंडलीत गुरु चांडाल योग बनल्यानेही अनेक समस्या येतात. यावर मात करण्यासाठी चांडाल योगाची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या. 

Updated: Oct 7, 2022, 12:11 PM IST
Guru Chandal Yoga: काल सर्प दोषापेक्षाही धोकादायक 'गुरु चांडाल योग', यापासून दूर राहण्याचे हे उपाय title=

Guru Chandal Yoga Effects on Life: ज्योतिष शास्त्रात कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ आणि अशुभ योगांबद्दल सांगितले आहे. या योगांचा जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम होतो. कुंडलीत शुभ योग तयार झाल्यास व्यक्तीचे नशीब उजळते. तो राजाप्रमाणे आयुष्य जगतो. दुसरीकडे, अशुभ योग तयार झाल्यास, श्रीमंत कुटुंबात जन्म घेऊनही तो गरिबीत राहतो. सर्व प्रयत्न करुनही त्या व्यक्तीला यश मिळत नाही. कुंडलीतील अशुभ योगामध्ये सामान्यतः काल सर्प दोषाची चर्चा सर्वाधिक केली जाते. परंतु याशिवाय गुरु चांडाल योग हा देखील असाच एक अशुभ योग आहे जो जीवनाचा नाश करतो. 

अशा प्रकारे तयार होतो गुरु चांडाल योग  

कुंडलीत बृहस्पति, राहू आणि केतू यांच्या मिलनाने गुरु चांडाळ योग तयार होतो. हा योग ज्योतिष शास्त्रात अशुभ मानला गेला असला तरी काही विशेष परिस्थितींमध्ये हा योग शुभ फळ देतो. अशुभ गुरु चांडाळ योग व्यक्तीला प्रत्येक कामात यश देतो. कुंडलीत वेगवेगळ्या घरात असल्यामुळे गुरु चांडाल योग वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. जर कुंडलीत राहूपेक्षा गुरुची स्थिती बलवान असेल तर हा योग कमकुवत असेल आणि त्याचे दुष्परिणामही कमी होतील. दुसरीकडे जर कुंडलीत चांडाल योगाची स्थिती मजबूत असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

गुरु चांडालचे लक्षण आणि प्रभाव 

कुंडलीत गुरु चांडाल योग तयार झाल्यास व्यक्तीला कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. असे लोक विनाकारण काही कायदेशीर अडचणीत अडकतात आणि पैसा, प्रतिष्ठा गमावतात. अशा लोकांचे वैवाहिक जीवनही चांगले नसते. जो काही नोकरी किंवा व्यवसाय करतो, त्यात तोटा होतो किंवा रोजगार पुन्हा पुन्हा जातो. यामुळे, व्यक्तीला वारंवार त्याचे काम बदलावे लागते. 

गुरु चांडाल योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाय

गुरु चांडाल योगाचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिष आणि लाल किताबामध्ये काही उपाय सांगितले आहेत. यासाठी केशर आणि हळदीचा तिलक रोज लावावा. कुंडलीत देवगुरु बृहस्पति बळकट करण्यासाठी वडील, पालक, शिक्षक आणि ब्राह्मण यांचा आदर करा. भगवान विष्णूची पूजा करा. घरामध्ये केळीचे रोप लावून त्याची रोज पूजा करणे, चांडाल योगापासून मुक्ती मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. याशिवाय राहू मंत्रांचा जप करावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)