October Monthly Horoscope : पुढच्या महिन्यात ग्रहांचं गोचर कोणासाठी अनुकूल? तुम्ही या राशीचे असाल तर मिळेल असं फळ

October Monthly Horoscope : 10 ऑक्टोबरच्या आसपास नकारात्मक विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.  ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 21, 2022, 08:42 PM IST
October Monthly Horoscope : पुढच्या महिन्यात ग्रहांचं गोचर कोणासाठी अनुकूल? तुम्ही या राशीचे असाल तर मिळेल असं फळ title=

October Monthly Horoscope Cancer : कर्क राशीच्या (Cancer) लोकांसाठी ऑक्टोबर (October) महिना चढ-उतारांचा असू शकतो. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 10 ऑक्टोबरच्या आसपास नकारात्मक विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.  ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच या काळात तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. तुमच्यावर नकारात्मकतेला वरचढ होऊ देऊ नका. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही सरकारी करार मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. (october monthly horoscope cancer beginning of month will be bang for people of cancer will also get support from family)

प्रेमसंबधात असलेले लग्नबेडीत

या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. पण अर्ध्या महिन्यानंतर तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. प्रेमसंबधात असलेल्यांचं लग्नाचा विचार असेल, तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो. अर्ध्या महिन्यानंतर दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

कौटुंबिक जीवन सकारात्मक राहील. कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. लहान भावंडांचे सहकार्यही मिळू शकतं. कुटुंबात सुरू असलेला जुना वादही या काळात निकाली निघू शकतो.

जोडीदारासोबत वाद होऊ शकतो, जो हाताळला नाही तर मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते. जोडीदाराशी संभाषणात संयमात बोला. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या. खोटं बोलणं टाळा.

आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. पण आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या त्रास देऊ शकतात. आहाराबाबत काळजी घ्या. या दरम्यान कोणत्याही प्रकारची उधळपट्टी टाळा. पैसे जमा करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आर्थिक समस्या वाढू शकते.