आजचे राशीभविष्य | रविवार | ३१ मार्च २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 31, 2019, 09:14 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | ३१ मार्च २०१९ title=

मेष- दिवस फायदेशीर असेल. शक्य तितक्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडा. आजच्या दिवशी फार महत्त्वाकांक्षी असाल. इतरांची मदत करण्यासाठी तयार असाल. राजकाराणात असणाऱ्यांना फायदा होईल. मोठं यश मिळण्याचे संकेत आहेत. कला आणि संगीत क्षेत्रात रस वाढेल. 

वृषभ- दिवस उत्साही असेल. सहकारऱ्यांना तुमची मदत होईल. नव्या कल्पनांवर काम कराल. अडचणीच्या परिस्थितीचा धीराने सामना करा. शांत डोक्याने कृती कराल तर, प्रशंसेस पात्र ठराल. 

मिथुन- व्यापार किंवा एखाद्या नव्या कामाची सुरुवात करु शकाल. नवे बेतही आखू शकाल. एखादं मोठं स्वप्न पूर्ण होईल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. प्रय़त्न करत राहा. काही गोष्टींची नव्याने सुरुवात करावी लागू शकते. 

कर्क- करिअरच्या बाबतीत आज जे निर्णय़ घ्याल त्याचे परिणाम दूरगामी ठरतील. सामाजिक वर्तुळात सक्रिय असाल. सर्वांशी मिळून मिसळून वागा. शेजारी, नातेवाईकांची मदत मिळेल. प्रेमाच्या नात्यांची सुरुवात होऊ शकते. काही कामं इतरांवर सोपवा. नव्या वाहनाच्या खरेदीचा विचार कराल. 

सिंह- आत्मविश्वास वाढेल. काही दुर्लक्षित आर्थिक कामं आज पूर्ण करण्याची चांगली संघी आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यापारत प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. साथीदाराकडून मदत मिळेल. 

कन्या- दिवस सामान्य असेल. नियम, स्वत:ची प्रतिष्ठा या सर्व गोष्टींना जास्ता महत्त्व द्याल. प्रेमाच्या नात्यांसाठी दिवस चांगला आहे. वेळ येताच तुमचं म्हणणं इतरांना पटवून द्याल. तेव्हापर्यंत धीर ठेवा. 

तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्ट मनापासून करा. कोणीही व्यक्ती तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आली तर त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या. काल्पनिक गोष्टींपासून दूर राहा. व्यावहारिक राहा. संधी मिळाल्याच एकट्याने परिस्थितीचा विचार करा. 

वृश्चिक- आजचा संपूर्ण दिवस व्यग्र असाल. व्यापार किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचा योग आहे. मित्रांच्या मदतीने अनेक कामं पूर्ण होतील. बढतीचं पद मिळण्याची इच्छा आणखी तीव्र होईल. कामाच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. 

धनु- आज दिवसभर तुमच्याकडे भरपूर काम असेल. वेळ काढून ही कामं पूर्ण करा. काही नव्या गोष्टी करण्याता प्रयत्न कराल. कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा. तुमची प्रतिमा चांगली असेल. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. आरोग्य चांगलं असेल. 

मकर- दूर राहणाऱ्य़ा एखाद्या विद्वान व्यक्तीशी भेट घडू शकते. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने काही कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. अभ्यासात मन रमेल. 

कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. पगदारवाढीचीही शक्यता आहे. जवळच्या नात्यांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. काही नवी कामं हाती घ्याल. दैनंदिन कामं सहजपणे आणि नशीबाच्या साथीने पूर्ण होतील. व्यापार चांगला होईल. विद्यार्थ्यांसाठीही दिवस चांगला आहे. 

मीन- अनेकजण तुमच्याकडे सल्ले मागतील. सर्व परिस्थिती तुमच्या बळावर सावरण्याचा प्रयत्न कराल. ज्या कामावर गेल्या काही कामावर मेहनत घेत आहात ती पूर्णत्वास जातील. इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींची भेट घडण्याचा य़ोग आहे.