राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, प्रदीप सिंगला रौप्यपदक

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली. 

Updated: Apr 9, 2018, 07:52 AM IST
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, प्रदीप सिंगला रौप्यपदक title=

गोल्डकोस्ट : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली. 

प्रदीपने १५२ किलो स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये २०० किलोसह एकूण ३५२ किलो वजन लिफ्ट केले.  प्रदीपने मिळवलेल्या या रौप्यपदकासोबत भारताच्या खात्यात एकूण १ पदकांची कमाई झालीये. यात सात गोल्ड, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकाचा समावेश आहे. 

आज दिवसभरात अनेक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी पदकांची भर पडणार आहे. नेमबाजीत आज भारताला पदकांच्या अपेक्षा आहेत. तसेच बॉक्सिंगमध्ये मेरी कोमकडूनही पदकाची अपेक्षा आहे.