109 रनवर ऑलआऊट अफगाणिस्तानने बनवले अनोखे रेकॉर्ड

भारत विरुद्ध अफगाणिस्तान ऐतिहासिक सामना

Updated: Jun 15, 2018, 03:34 PM IST
109 रनवर ऑलआऊट अफगाणिस्तानने बनवले अनोखे रेकॉर्ड title=

बंगळुरू : अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत अफगाणिस्तानला 109 रनवर ऑलऑऊन करत फालऑन दिला. या ऐतिहासिक टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने 6 विकेट गमवत 347 रन केले. त्यानंतर संपूर्ण टीम 474 रनवर ऑलआऊट झाली. पाहुण्या संघाने फक्त 109 केले.

भारताकडून अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने 8 ओव्हरमध्ये 27 रन देत 4 विकेट घेतले. ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने दोन-दोन विकेट घेतले. उमेश यादवने एक विकेट घेतला. अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक मोहम्मद नबीने 24 रन केले. त्यानंतर मुजीब उर रहमानने 15, मोहम्मद शहजाद आणि रहमत शाहने 14-14 रन केले. हशमतु्ल्लाह शाहिदी आणि कर्णधार असगर स्टानिकजाईने 11 रन केले.

अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या टेस्टमध्ये सगळ्यात कमी ओव्हरमध्ये फलंदाजी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. संपूर्ण टीम 27.5 ओव्हरमध्ये आउट झाली. याआधी न्यूझीलंडने 47.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली होती. त्यानंतर बांगलादेश दुसऱ्या इनिंगमध्ये 46.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली होती. अफगाणिस्तान पहिल्या टेस्टमध्ये सगळ्यात कमी ओव्हरमध्ये ऑलआऊट झालेली टीम बनली आहे. अफगाणिस्तान टीम सगळ्यात जास्त लीडने फॉलोऑन खेळणारी टीम आहे. अफगाणिस्तान या सामन्यात 365 रन मागे आहे. वेस्ट इंडिजने  1928 मध्ये 224 रनच्या अंतरात फॉलोऑन खेळली होती.