विराटला कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा शेवटचा चान्स, इथून ही घ्यावी लागणार माघार?

तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळल्यामुळे त्याच्यावर खूप ताण येत आहे.

Updated: Sep 17, 2021, 07:04 PM IST
विराटला कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा शेवटचा चान्स, इथून ही घ्यावी लागणार माघार? title=

मुंबई : विराट कोहलीने भारतीय संघाच्या टी -20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेनंतर आता कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडावे की, नाही यावर चर्चा केली जात आहे. कारण आयपीएलमुळे येणारा ताण हा इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी येणाऱ्या ताणापेक्षा कमी नाही. विराटने टी -20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्या मागचे असे कारण सांगितले जात आहे की, तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळल्यामुळे त्याच्यावर खूप ताण येत आहे, ज्यामुळे त्याला स्वत:ला वेळ द्यायला मिळत नव्हते. त्यामुळे आता आयपीएलमुळे होणाऱ्या तणावामुळे देखील विराट कर्णधारपद सोडू शकतो का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

विराटला शेवटची संधी?

असे समजले जाते की, जर आरसीबीचा संघ यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला, तर असे होऊ शकते की, कोहली आरसीबीचे कर्णधारपद सोडेल. बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले, 'कोहलीच्या बाजूने ही काय घोषणा होती? तुम्हाला वाटतं का की, यामुळे कामाचा ताण कमी होईल? 

RCB कर्णधारपद कठीण!

बीसीसीआयच्या माजी अधिकाऱ्याने सांगितले की, "मी कुठेतरी वाचले होते की, कोरोना महामारीनंतर भारतीय संघाने डिसेंबर 2020 पासून फक्त 8 टी -20 सामने खेळले आहेत. मला वाटते की, आयपीएलचे सामने त्यापेक्षा अधिक खेळले गेले असेल. आयपीएलमध्ये कर्णधार होणे ही सोपी गोष्ट नाही. ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे आणि फ्रँचायझींकडे दुर्लक्ष होत आहे."

विराटवर कामाचा ताण अजूनही

बीसीसीआयचे माजी अधिकारी म्हणाले, "कोहली आरसीबीचे कर्णधारपदही सोडेल का? त्याच्यावरचा कामाचा ताण अजूनही संपलेला नाही. फलंदाजीत अफाट यश मिळवल्यानंतरही, कोहली व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, विशेषतः टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून यश मिळवण्यात अपयशी ठरला आहे."

आरसीबी कर्णधारपदावर कोहलीचा रेकॉर्ड

विराट कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी अत्यंत खराब रेकॉर्ड होता. तो 2013 पासून कर्णधारपद सांभाळत आहे, पण एकदाही सांघिक विजेतेपद पटकावू शकला नाही. 2016 नंतर, आरसीबीचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पात्र ठरला होता. तर 2017 आणि 2019 मध्ये तो पाईंट टेबलच्या तळाशी होता, तर 2018 मध्ये संघ सहाव्या क्रमांकावर होता.

2016 चा हंगाम छान होता

2016 चा हंगाम कोहलीसाठी उत्तम होता, त्या काळात त्याने 973 धावा केल्या. त्यानंतर 2018 मध्ये कोहली 500 धावांच्या पुढे पोहोचू शकला नाही. आयपीएल 2021 च्या हंगामात, त्याने सात सामन्यांत 33 ची सरासरी केली आहे, ज्यात फक्त एक अर्धशतक आहे.

भारताच्या आयसीसी स्पर्धांमध्ये कोहलीला त्याच्या निर्णयामुळे सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागले आहे.