'या' फलंदाजाची तुफान फटकेबाजी! 28 बॉलमध्ये शतक अन् 10 ओव्हरमध्ये उभा केला धावांचा डोंगर

7 चौकार आणि 13 षटकारांची आतषबाजी करत ठोकल्या 198 धावा 

Updated: Jun 8, 2021, 11:16 AM IST
'या' फलंदाजाची तुफान फटकेबाजी! 28 बॉलमध्ये शतक अन् 10   ओव्हरमध्ये उभा केला धावांचा डोंगर title=

मुंबई: 35 बॉलमध्ये शतक पूर्ण करण्याचा विक्रम ऐकला असेल पण त्यालाही मागे सारत एका फलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली आहे. 7 चौकार आणि 13 षटकारांची आतषबाजी करत 10 ओव्हरमध्ये धावांचा  डोंगर रचला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या  फलंदाजाच्या देदीप्यमान कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये एका फलंदाजाने 28 बॉलमध्ये शतक झळकावत मैदानात तुफान आपलं. 10 षटकांच्या सामन्यात या खेळाडूने केलेल्या कामगिरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सलामीला आलेल्या या खेळाडूने शेवटच्या विकेटवर विकेट गमावली पण त्याआधीच धावांचा पाऊस पडला. kummerfelder खेळणाऱ्या अहमद मुसद्दिकने THCC Hamburg विरुद्ध खेळून हा पराक्रम केला आहे. 

अहमद मुसद्दिकने युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासात 28 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करून सर्वात वेगवान शतक झळकवणारा खेळाडू  ठरला आहे. त्याने भारतीय वंशाचा फलंदाज गौहर माननचा विक्रम मोडला. गौराजने क्लूज क्रिकेट क्लब विरुद्ध 29 बॉलमध्ये शतक ठोकले.

32 वर्षांच्या या खेळाडूनं पहिल्याच चेंडूपासून आक्रमकपणा दाखवला. 33 चेंडूमध्ये 115 धावा पूर्ण केल्या. तर त्याने सामन्यात एकून 198 धावांचा स्कोअर केला आहे. मुसाद्दिक 7 चौकार आणि 13 षटकार ठोकत 106 धावा 20 चेंडूमध्ये केल्या. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या फलंदाजीतील आक्रमकपणा दाखवून दिला होता. त्याच्या फलंदाजीसमोर विरुद्ध टीमच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. अभिनंदन झाच्या बॉलवर त्याला 26 धावा काढण्यात यश मिळालं. त्याने वेगवान गोलंदाज असो किंवा स्पिनर्स सर्वांनीच आपल्या आक्रमक फलंदाजीने धुवून काढलं.