Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे झाला मुंबईचा कॅप्टन, 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता!

Ajinkya Rahane: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. अशातच अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 2, 2024, 08:58 AM IST
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे झाला मुंबईचा कॅप्टन, 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता! title=

Ajinkya Rahane: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील टेस्ट टीममध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला नाही. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात अजिंक्यने चांगला खेळ केला होता. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. अशातच अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

येत्या काळात रणजी ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. रणजी ट्रॉफी 2024 च्या सुरुवातीच्या 2 सामन्यांसाठी मुंबईने त्यांच्या 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी मुंबईच्या टीमची कमान अजिंक्य रहाणेच्या हाती सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पृथ्वी शॉला टीममध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही. तसंच यशस्वी जयस्वाल टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या त्याचाही मुंबईच्या टीममध्ये सहभाग करण्यात आलेला नाही. 

रहाणेच्या खांद्यावर मुंबईची कमान

रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईने आपल्या 15 सदस्यीय टीमची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी अजिंक्य रहाणे हा बिहार आणि आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे. रहाणेने गेल्या सिझनमध्येही कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी टीम चौथ्या क्रमांकावर राहिली आणि बाद फेरीसाठी पात्र ठरू शकली नव्हती. अशा स्थितीत यावेळी टीमला दमदार कामगिरी करायची आहे.

पृथ्वी शॉला टीममध्ये जागा नाही

पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडलेल्या टीममध्ये मुंबईने पृथ्वी शॉचा समावेश केलेला नाही. काऊंटी क्रिकेट खेळताना शॉला गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता. मुंबईची टीम 5 जानेवारीपासून बिहारविरुद्ध रणजीच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर 12 जानेवारीपासून टीमचा सामना आंध्र प्रदेशशी होणार आहे.

पहिल्या सामन्यासाठी कशी असेल मुंबईची टीम

अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिष्टा, भूपेन ललवानी, हार्दिक तैमोर (विकेटकीपर), सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियान, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस और अथर्व अंकोलेकर

स्टँड बाय प्लेयर्स - अमोघ भटकल, आकाश आनंद, ध्रुमिल मटकर आणि सिलवेस्टर डिसूझा