सलामीवीर अजिंक्य रहाणेचे शानदार शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

Updated: Jun 25, 2017, 11:21 PM IST
सलामीवीर अजिंक्य रहाणेचे शानदार शतक title=

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

रहाणेने १०४ चेंडूत १०३ धावा केल्या. यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. त्याचे हे वनडेतील दुसरे शतक आहे.  वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकताना भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. 

भारताचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने ११४ धावांची दमदार सलामी दिली. शिखर धवन ६३ धावांवर बाद झाला.