Ajinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का?

Ajinkya rahane Shardul Thakur : 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं. 

Updated: Jun 12, 2023, 10:24 PM IST
Ajinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का? title=

Ajinkya rahane Shardul Thakur : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये अखेर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ( Team India ) 209 रन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यामध्ये मराठमोळ्या खेळाडूंचा उत्तम खेळ पहायला मिळाला. यामध्ये 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. दरम्यान यावेळी फलंदाजी करताना या दोघांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

शार्दूल आणि अजिंक्यचा व्हिडीओ व्हायरल

पहिल्या डावामध्येच टीम इंडियाच्या फलंदाजांची खराब कामगिरी समोर आली. यावेळी भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली होती. मात्र अजिंक्य ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल( Shardul Thakur ) यांनी कठीण परिस्थितीत शतकी भागीदारी करत फॉलोऑन टाळला. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं. 

विरोधी टीमला रणनीती समजू नये यासाठी दोघांनी पार्टनरशिप दरम्यान मराठीमध्ये संवाद साधण्यावर भर दिला. दरम्यान या दोघांचंही मराठीतील संभाषण माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओनुसार, अजिंक्य रहाणे म्हणतोय, खेळत राहा खेळत राहा चांगलं आहे. शाब्बास..एक एक बॉल एक एक बॉल..चांगलं आहे खेळत राहा. तर अजिंक्यला प्रत्युत्तर देताना शार्दुलने सांगितलं की, पॉईंट मागे केलाय हा...

या दोघांचंही हे मराठी संभाषणा चाहत्यांना मात्र फारच आवडलंय. ओव्हलच्या मैदानावर झालेलं हे मराठी संभाषण चांगलंच व्हायरल होतंय. 

WTC 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 रन्सने विजय मिळवलाय. रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला 173 रन्सची मजबूत आघाडी मिळाली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने दुसऱ्या डावामधये 270 रन्स करत टीम इंडियाला जिंकण्यासाठी 443 रन्सचं टार्गेट दिलं होतं. 

दरम्यान दुसऱ्या डावात देखील टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी पाचव्या दिवशी कांगारूंना सामना जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज होती. अखेर 234 रन्सवर संपूर्ण टीम इंडियाचा डाव आटोपला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.