Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी

Ajinkya Rahane Double Century: मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. 

Updated: Dec 21, 2022, 06:20 PM IST
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची बॅट तळपली, Ranji Trophy त ठोकली डबल सेंच्यूरी  title=

Ajinkya Rahane Double Century: टीम इंडियातून (Team India) सध्या बाहेर असलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) डबल सेंच्यूरी ठोकली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) हैदराबाद संघाविरूद्ध त्याने ही उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याने अशा प्रकारची खेळी करून सिलेक्शन कमिटीला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. दरम्यान सध्या त्याच्या डबल सेंच्यूरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

कर्णधाराला साजेशी खेळी 

मुंबईच्या (Mumbai Team) टीमचा कर्धणार असलेल्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) हैदराबादविरूद्ध (Mumbai vs Hyderabad) डबल सेंच्यूरी मारली आहे. अजिंक्यने 261 बॉलमध्य़े 204 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. या त्याच्या कर्णधार साजेशा खेळीने मुंबई टीमने 600 धावांचा पल्ला गाठलाय. दरम्यान अजिंक्य रहाणेने मंगळवारी 121 बॉल्समध्ये 18 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं होतं. काल दिवस अखेर तो 139 रन्सवर नाबाद होता. त्यानंतर आज पुन्हा त्याने धडाकेबाज खेळी करत त्याची डबल सेंच्यूरी पुर्ण केली.  

सरफराजचं शतक 

विराट कोहलीचा शिलेदार सरफराज खानने (Sarfaraz Khan) देखील या सामन्यात शतक ठोकलं आहे.सरफराजने 161 बॉलमध्ये 126 नाबाद धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्य़ाने 18 चौकार मारले आहेत.  

मुंबईचा 651 धावावर डाव घोषित

अजिंक्य रहाणेच्या 204, यशस्वी जयस्वाल 162, सूर्यकुमार यादव 90, सरफराजच्या (Sarfaraz Khan) नाबाद 126 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबई संघाने 651 धावावर 6 बाद असा डाव घोषित केला आहे. आता हैदराबाद संघ पहिल्य़ा डावात किती धावा करतो, हे पाहावे लागणार आहे. 

दरम्यान मुंबई संघाने (Mumbai vs Hyderabad) आता पहिल्या डावात 651 धावा केल्या आहेत. आता हैदराबाद संघ या धावा पुर्ण करतो की, या धावांच्या आत त्यांना ऑलआऊट करण्यात मुंबई संघ यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) डबल सेंच्यूरी ठोकून बीसीसीआयच दार ठोठावल आहे. आता 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या सिरीजमध्ये अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.