IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!

Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 26, 2024, 03:24 PM IST
IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला! title=
IND vs ENG, Anil Kumble, Joe Root, Ben Stokes

IND vs ENG 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs England) टीम इंडियाने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं. भारतीय फिरकीपटूंच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर गडगडला. भारतीय स्पिनर्सने 8 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर पाठवलं. मात्र, भारतीय गोलंदाजांसारखी किमया इंग्लंडच्या गोलंदाजांना दाखवता आली नाही, अशातच आता टीम इंडियाचे माजी स्टार गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) याने बेन स्टोक्सच्या निर्णयावर (Ben Stokes) टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने आपल्या खेळात सुधार केल्याचं दिसून आलं.

काय म्हणाला अनिल कुंबले?

मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो. यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूवर तो भारी पडू शकला असता. तुम्ही इंग्लंडच्या इनिंगवेळी पाहिलं असेल की, आश्विनने जसं डावखुऱ्या फलंदाजांना नाचवलं तसं जो रूटने भारतीय फलंदाजांना अडकवलं असतं, मात्र इंग्लंडने चूक केली, असं अनिल कुंबळेने म्हटलं होतं. 

भारतीय गोलंदाजांनी आज योग्य रित्या गोलंदाजी केली. स्पिनर्सच्या डिपार्टमेंटमध्ये आश्विनने गुड लेन्थला टाकलेले बॉल इंग्लंडच्या गोलंदाजांच्या कामी आले नाहीत. तर जडेजाने टाकलेले बॉल पूर्ण ऑन पिच असल्याने त्याला विकेट्स मिळाल्या. त्याचबरोबर अक्षरच्या उंचीचा फायदा त्याने योग्यरित्या घेतला, असंही अनिल कुंबळे म्हणाला आहे.

इंग्लंडचं काय चूकलं?

इंग्लंडचे फलंदाज भारतीय खेळपट्टीला समजू शकलेले नाहीयेत. भारतीय गोलंदाजांनी जशी टप्प्यात गोलंदाजी केली, तशी इंग्लंडची गोलंदाजी दिसली नाही. त्यांनी खूपच लवकर फिरकीचा मारा सुरू केला. जो रूटला गोलंदाजीला न पाठवणं ही मोठी चूक झाली. फिल्डिंगच्या क्षेत्रात देखील त्यांना चमक दाखवता आली नाही. स्लिपचे फिल्डर योग्य वेळेत तिथं नव्हते, असंही अनिल कुंबळेने म्हटलंय.

भारतीय प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंडची प्लेइंग-11: जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जॅक लीच.