विराट-अनुष्काच्या मुलीचे बोबडे बोल, पहिल्यांदा म्हणाली.... पाहा व्हिडीओ

वामिकाने पहिल्यांदाच अनुष्काला 'आई' म्हणून मारली हाक

Updated: Jan 2, 2022, 07:06 PM IST
विराट-अनुष्काच्या मुलीचे बोबडे बोल, पहिल्यांदा म्हणाली.... पाहा व्हिडीओ title=

मुंबई: प्रत्येक पालकांची इच्छा असते आपल्या बाळाच्या तोंडातून आपलं म्हणजे आई किंवा बाबा हे शब्द यावेत. पहिल्यांदा आई म्हणणार की बाबा यावरून बऱ्य़ाचदा नवरा-बायकोमध्ये पैजही लागते. आपल्या चिमुकल्या बाळाच्या तोंडातून पहिले बोबडे बोल ऐकण्यासाठी आई-वडिलांचे कान खूप आतूर असतात. 

आपल्या चिमुकल्याने उच्चरलेले पहिले शब्द आई-वडील कधीच वसरू शकत नाही. विराट आणि अनुष्काच्या मुलीनं वामिकाने पहिला शब्द उच्चारला आहे. वामिकाचे हे शब्द दोघांसाठी आणि चाहत्यांसाठी लाख मोलाचे आहेत. 

वामिकाने पहिला शब्द माँ म्हणजे आई असा उच्चरला आहे. आईला पहिल्यांदा तिने हाक मारली. अनुष्का आणि विराट कोहलीला याचा झालेला आनंद त्याने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.