FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!!

फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केलाय.

Updated: Dec 19, 2022, 01:01 AM IST
FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!! title=

FIFA World Cup Final : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. अर्जेंटीनाच्या टीमने फ्रान्सच्या टीमवर विजय मिळवला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना अतिशय रंजक झाला होता. अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप होता.

अर्जेंटींनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने त्याच्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अर्जेंटीनाच्या फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. त्याने अंतिम फेरीत शानदार खेळ करत पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. लुसेल स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. 

निर्धारित वेळेपर्यंत हा फायनलचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर एक्स्ट्रा टाईम देण्यात आला होता. या एक्स्ट्रा टाईममध्ये मेस्सी आणि एम्बाप्पे यांनी 1-1 गोल केला. अशा प्रकारे सामना पुन्हा 3-3 असा बरोबरीत सुटला. यानंतर, अंतिम सामन्याचा रिझल्ट पेनल्टी शूटआऊटमध्ये करण्यात आला. यामध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. यावेळी अर्जेंटीनाचा गोलकीपर Emiliano Martínez विजयाचा शिल्पकार ठरलाय.

मेस्सीने 2 तर एम्बाप्पेने मारले 3 गोल्स

अंतिम सामन्यात कायलियन एम्बापेने आज हॅट्ट्रिक केली आहे. त्याने तिन्ही गोल 80व्या (पेनल्टी), 81व्या आणि 118व्या (पेनल्टी) असे गोल केले आहेत. असं असूनही एम्बाप्पे त्याच्या टीमला चॅम्पियन बनवू शकला नाही. दुसरीकडे लिओनेल मेस्सीने सामन्यात दोन गोल केलेत. मेस्सीने 23व्या (पेनल्टी) आणि 108 मिनिटांवर गोल केले होते. अर्जेंटिनासाठी अँजेल डी मारियाने ३६व्या मिनिटाला गोल केला.

अर्जेंटिना टीमने वर्ल्डकपच्या इतिहासातील तिसरं विजेतेपद पटकावलंय. अर्जेंटिनाच्या टीमने यापूर्वी 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. याशिवाय अर्जेंटिना तब्बल तीन वेळा (1930, 1990, 2014) उपविजेता ठरलाय. 

दुसरीकडे, फ्रान्स टीमचा सलग दुसऱ्यांदा आणि एकूणच तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगलंय. आजच्या पराभवानंतर एम्बाप्पेचे डोळे पाणावले होते. यापूर्वी फ्रान्सची टीम 1998 आणि 2018 मध्ये चॅम्पियन बनली होता.