Arjun Tendulkar: गोलंदाजीनंतर आता अर्जुन ओपनिंगला फलंदाजी करणार? कोचचं मोठं विधान

गेल्या 4 सामन्यामध्ये अर्जुनला (Arjun Tendulkar) 3 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. अशातच आता अर्जुनच्या कोचने त्याच्याबाबत मोठं विधान केलंय.

Updated: Apr 28, 2023, 08:39 PM IST
Arjun Tendulkar: गोलंदाजीनंतर आता अर्जुन ओपनिंगला फलंदाजी करणार? कोचचं मोठं विधान title=

Arjun Tendulkar: गेल्या 3 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) मुलगा आयपीएलमध्ये (IPL 2023) डेब्यूची प्रतिक्षा करत होता. अखेर आयपीएल 2023 मध्ये त्याने डेब्यू केला. यावेळी त्याने त्याच्या दुसऱ्या सामन्यात म्हणजेच हैदराबादविरूद्धच्या सामन्यात त्याने त्याच्या आयपीएल (IPL) करियरमधील पहिली विकेट देखील घेतली. गेल्या 4 सामन्यामध्ये अर्जुनला (Arjun Tendulkar) 3 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. अशातच आता अर्जुनच्या कोचने त्याच्याबाबत मोठं विधान केलंय.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) हे अर्जुन तेंडुलकरचे कोच आहेत. अर्जुनने त्यांच्याकडून क्रिकेट, गोलंदाजी यांचं प्रशिक्षण घेतलं आहे. नुकतंच योगराज यांनी एका वृत्तपत्राला इंटरव्यू दिला. यावेळी त्यांनी अर्जुनबाबत मोठं विधान केलं आहे. 

अर्जुनबाबत काय म्हणाले योगराज?

योगराज सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे, अर्जुनला जर योग्य संधी मिळाली तर तो त्याच्या वडिलांप्रमाणे उत्तम कामगिरी करेल. आयपीएलमध्ये रोहित शर्माने अर्जुनला नंबर 3 किंवा ओपनिंगवर खेळवलं पाहिजे. यामुळे त्याला त्याच्या पद्धतीने आणि खुलेपणाने खेळण्याची संधी मिळू शकते. माझ्या मताने त्याला केवळ एका संधीची गरज आहे. तो एक उत्तम गोलंदाज तर आहेत, सोबतच तो एक उत्तम फलंदाज देखील आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये काही प्रमाणात कमी जाणवते.

अर्जुनची गोलंदाची पाहिली तर कोनामध्ये थोडी कमतरता दिसून येतेय. त्याचे हात 45 डिग्री वर जातात. ज्यादिवशी अर्जुन कानापाशी हात घेऊन गोलंदाजी करेल तेव्हा त्याचा वेग अधिक वाढणार आहे. तो 145 किमीपेक्षाही अधिक वेगाने गोलंदाजी करेल. याशिवाय तो बुमराह आणि मलिंगाप्रमाणेही गोलंदाजी करेल.

अर्जुन घेतोय मेहनत

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अर्जुनने डेब्यू केला होता. तर हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या आयपीएलच्या करियरमधील पहिली विकेट पटकावली होती. यावेळी त्याने 2.5 ओव्हर्समध्ये 18 रन्स देत एक विकेट काढली होती. पंजाब विरूद्धच्या सामन्यात अर्जुनची फलंदाजांकडून धुलाई झाली. मात्र गुजरातविरूद्धच्या सामन्यात त्याने कमबॅक केलं. 

गुजरातविरूद्ध अर्जुनने केली फलंदाजी

मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबईचा 55 रन्सने पराभव झाला. यावेळी 20 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांचे नाकीनऊ आले. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरनेही फलंदाजी केली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फलंदाजी करताना त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्स केले. यामध्ये त्याच्या या खेळीत एका सिक्सचा देखील समावेश आहे.