पहिल्या सामन्यात दणदणीत विजय, त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं, पण का?

 इंग्लंड (England) विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला (Australia) मोठा झटका लागलाय.

Updated: Dec 12, 2021, 06:25 PM IST
पहिल्या सामन्यात दणदणीत विजय, त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं, पण का? title=

कॅनबेरा : एशेज सीरिजमधील (Ashes series 2021) पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) 9 विकेट्सने मात केली. यासह 5 सामन्यांच्या या प्रतिष्ठेच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली. यानंतर आता दुसरा कसोटी सामना हा 16 ते20 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा झटका लागलाय. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागू शकतं. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. (Ashes series 2021 22 eng vs aus big blow to australia josh hazlewood is not fit to played in 2nd test against england due to side strain injury)

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला (josh hazlewood) दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही.

जोशला संघातून बाहेर करण्यात आलेलं नाही. मात्र जर तो दुसऱ्या कसोटीत सिलक्शनसाठी उपलब्ध राहिला नाही, तर त्याच्या जागी झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) संधी मिळण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी जोश या दुखापतीतून सावरेल, अशी आशा ऑस्ट्रेलिया टीमला आहे.

जोशने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 1 असे एकूण 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता जोश दुसऱ्या कसोटीआधी दुखापतीतून सावरतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  

टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन. 

इंग्लंड क्रिकेट टीम : जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स , ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.  
 
उर्वरित कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

दुसरा सामना, 16-20 डिसेंबर, एडिलेड ओव्हल.

तिसरा सामना, 26-30 डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड.

चौथा सामना, 5-9 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राऊंड.

पाचवा सामना, 14-18जानेवारी, ब्लंडस्टोन अरेना.