आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, विराटला विश्रांती

 अंबाती रायडू, मनीष पांडे, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांचा टीममध्ये समावेश 

Updated: Sep 1, 2018, 01:49 PM IST
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, विराटला विश्रांती title=

मुंबई : 15 सप्टेंबरासून संयुक्त अरब आमिरातमध्ये खेळण्यात येणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीय. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला कंबरेच्या त्रासामुळे विश्रांती देण्यात आलीय. तर विराटच्या गैरहजेरीत संघाची धुरा रोहीत शर्माकडे सोपवण्यात आलीय... तर उपकर्णधार असेल शिखर धवन... भारतीय क्रिकेट टीम दीड महिन्यात इंग्लंड दौऱ्यानंतर टूर्नामेंट खेळणार आहे. यासाठी आशिया कपमध्ये वरच्या फळीतील खेळाडुंना विश्रांती देण्यात आलीय. 

50 ओव्हरच्या या फॉर्मेटमध्ये अंबाती रायडू, मनीष पांडे, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. 

अशी असेल टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के एल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि खलील अहमद
 
खलील अहमद हा संघातील नवीन चेहरा असेल. गेल्या वर्षी चॅम्पियन ठरलेला भारत आशिया कप क्रिकेट टूर्नामेंटमध्ये 19 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. तर एक दिवसापूर्वी टीम आपल्या खेळाला क्वालीफायरविरुद्ध करणार आहे. 

15 सप्टेंबरपासून सुरुवात

ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि क्वालीफायर तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफागनिस्तानला जागा मिळालीय. टूर्नामेंटची पहिली मॅच दुबईत 15 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांग्लादेश दरम्यान खेळण्यात येईल. तर निर्णायक लढाई 28 सप्टेंबर रोजी रंगेल... प्रत्येक ग्रुपमधून वरिष्ठ दोन टीम्स सुपर चार साठी क्वालीफाय होतील... त्यानंतर दोन टीम्समध्ये फायनल मॅच रंगेल. 

आशिया कप:- 

15 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (दुबई)

16 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर (दुबई)

17 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)

18 सप्टेंबर: भारत विरुद्ध क्वालिफायर (दुबई)

1 9 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)

सप्टेंबर 20: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (अबुधाबी)

सुपर चार:

21 सप्टेंबर: ग्रुप ए विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (दुबई), ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (अबूधाबी)

23 सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध ग्रुप ए उपविजेता (दुबई), ग्रुप बी विजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबुधाबी)

25 सप्टेंबर: गट अ विजेता विरुद्ध गट ब विजेता (दुबई)

26 सप्टेंबर: ग्रुप ए उपविजेता विरुद्ध ग्रुप बी उपविजेता (अबु धाबी)

28 सप्टेंबर : अंतिम लढत (दुबई)