Video:भारत हाँगकाँग सामन्यानंतर 'शाह'ने स्टेडियमध्ये जाऊन केलं प्रपोज, गर्लफ्रेंड म्हणाली...

प्रपोज केल्यानंतर गर्लफ्रेंड म्हणाली, "मला..."

Updated: Sep 1, 2022, 12:37 PM IST
Video:भारत हाँगकाँग सामन्यानंतर 'शाह'ने स्टेडियमध्ये जाऊन केलं प्रपोज, गर्लफ्रेंड म्हणाली... title=

Asia Cup 2022 India Vs Hong kong: आशिया कप 2022 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात पराभवाची धूळ चारल्यानंतर हाँगकाँगला (India Vs Hong Kong) पराभूत केलं आहे. हाँगकाँगच्या खेळाडू भारताच्या भेदक माऱ्यासमोर टिकू शकले नाहीत. भारताने 2 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हाँगकाँगचा संघ 20 षटकात 5 गडी गमवून 152 धावा करू शकला. भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला आणि आपल्या गटात अव्वल स्थान मिळवलं असून सुपर 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. हाँगकाँगनं (Hong Kong) हा सामना गमावला असला तरी एका खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय वंशाच्या आणि हाँगकाँग संघातील किंचित शाहनं (Kinchit Shah) भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं. 

सामना संपल्यानंतर किंचित शाहने पूर्ण प्लानिंगसह आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. सामन्यानंतर किंचित थेट प्रेक्षक बसलेल्या ठिकाणी पोहोचला. यावेळी किंचित आपल्या गर्लफ्रेंडसमोर गुडघ्यावर बसला आणि हातात रिंग घेऊन प्रपोज केलं. अचानक असा प्रकार पाहून गर्लफ्रेंडही आनंदीत झाली आणि तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

भारताविरुद्धच्या सामन्यात किंचित शाहने 28 चेंडूत 30 धावा केल्या. या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला.