एशियन गेम्समध्ये भारताची दमदार सुरुवात, 2 मेडल नावावर

Asian Games Live Updates: आशियाई क्रिडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने दोन रौप्य पदके जिंकली आहेत. पहिले पदक महिला एअर रायफल संघाने जिंकले. 

Updated: Sep 24, 2023, 08:17 AM IST
एशियन गेम्समध्ये भारताची दमदार सुरुवात, 2 मेडल नावावर title=

Asian Games Live Updates: संपूर्ण देशातील क्रिडा प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्याआशियाई क्रीडा स्पर्धेतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने दोन रौप्य पदके जिंकली आहेत. पहिले पदक महिला एअर रायफल संघाने जिंकले. या संघाने एकूण 1886 गुण मिळवले. ज्यामध्ये रमिताने 631.9, मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 गुण मिळवले.

तर पुरुषांच्या रोईंगमध्ये अरुण आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. दोघांनी आपली शर्यत 6 मिनिटे 28 सेकंदात पूर्ण केली. मादेर टॅलीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोइंग दुहेरीत अरुण आणि अरविंद हे दोन्ही खेळाडू भारतीय लष्कराचे आहेत.

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा-2023 मध्ये भारताला पहिले पदक मिळाले आहे. नेमबाजीत, भारताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत 1886 गुणांसह रौप्य पदक जिंकले आहे. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता या त्रिकुटाने भारतासाठी हे पदक जिंकले आहे. रमिताने 631.9, मेहुलीने 630.8 आणि आशीने 623.3 गुण मिळवले. या स्पर्धेतील सुवर्णपदक चीनकडे गेले.