ऑस्ट्रेलियाकडून खेळपट्टीशी छेडछाड? पाकिस्तानकडून कर्णधाराची अंपायरकडे तक्रार

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कराचीच्या मैदानावर पिचसोबत काहीतरी करत असल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Mar 16, 2022, 08:21 AM IST
ऑस्ट्रेलियाकडून खेळपट्टीशी छेडछाड? पाकिस्तानकडून कर्णधाराची अंपायरकडे तक्रार title=

कराची : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कराचीमध्ये दूसरा टेस्ट सामना खेळला जातोय. दरम्यान काल या सामन्याचा चौथा दिवस होता. यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कराचीच्या मैदानावर पिचसोबत काहीतरी करत असल्याचं दिसून आलं. यानंतर त्याची अंपायरकडे तक्रारही करण्यात आली. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरस झाल्याने एकच खळबळ माजली.

काय करत होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार?

कराचीमधील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अचानक पिचवर आला आणि त्याने हातोडा मारू लागला. कमिन्स हातोड्याने पिचवर बराच वेळ मारत होता. ही गोष्ट पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला खटकली आणि त्याने अंपायरकडे तक्रार केली. पॅट कमिन्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात पिचच्या पृष्ठभागावर काही भेगा पडल्या होत्या. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने हातोड्याने पिच दुरुस्त करू लागला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कमिन्स पिचशी छेडछाड करत असल्याचं दिसतंय.

दरम्यान पाकिस्तानचा हा दौरा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर हा सामना जिंकून सिरीजमध्ये आघाडी घेण्याचं दोन्ही टीम्स लक्ष्य आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत आहे.