इंग्लंडच्या मैदानात मॅच सुरु असताना ते रिक्षा घेऊन आले

क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक गंमतीजमती मैदानात पाहायला मिळतात. 

Updated: Aug 7, 2018, 08:06 PM IST
इंग्लंडच्या मैदानात मॅच सुरु असताना ते रिक्षा घेऊन आले title=

लंडन : क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक गंमतीजमती मैदानात पाहायला मिळतात. असाच प्रकार इंग्लंडमधल्या एका मैदानात दिसला. इंग्लंडमध्ये झालेल्या एका मॅचवेळी भारतीय चाहते मैदानात रिक्षा घेऊन आले. भारत आर्मी आणि बार्मी आर्मीमध्ये इंग्लंडच्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरु होता. या मॅचच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान भारत आर्मीचे चाहते रिक्षातून मैदानात पाणी घेऊन आले. भारत आर्मीनं हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ड्रिंक्स ब्रेकवेळी पाणी आणण्याची ही नवी पद्धत आहे. बीसीसीआय तुम्ही याची दखल घेत आहात का? असं ट्विट भारत आर्मीनं केलं आहे.

भारत आर्मी हा भारतीय क्रिकेट टीमला पाठिंबा देणारा इंग्लंडमधला एक ग्रुप आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारताच्या सगळ्या मॅचना हा ग्रुप हजेरी लावतो. आता ९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टवेळी भारत आर्मीचा ग्रुप लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताला पाठिंबा देताना दिसेल. भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज सुरु आहे. या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता.