मॉर्गनची तुफानी खेळी, टी-20 सामन्यात धावांचा पाऊस

मॉर्गनचं जलद अर्धशतक...

Updated: Feb 17, 2020, 11:59 AM IST
मॉर्गनची तुफानी खेळी, टी-20 सामन्यात धावांचा पाऊस title=

मुंबई : मॉर्गन इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंचुरियनमध्ये झालेल्या टी20 सामन्यात धावांचा पाऊस पडला आहे. ज्यामध्ये अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या सामन्यात एकूण 448 रन बनले. गोलंदाजांची फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली.

या सामन्यात आधी बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड पुढे 223 रनचं आव्हान ठेवलं होतं. ज्यामध्ये इंग्लंडने 19.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमवत विजय मिळवला.

या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधार इयोन मॉर्गननो 22 बॉलमध्ये 57 रन केले आणि टीमला विजयी केलं. मॉर्गनने एकूण 7 सिक्स ठोकले.

इयोन मॉर्गनने इंग्लंडकडून आणखी एक सर्वात फास्टेस शतक ठोकलं आहे. 21 बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केलं. याआधी 2019 मध्ये नेपियर येथे न्यूझीलंडच्या विरोधात त्याने 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. दुसऱ्यांना त्याने टी-20 सामन्यात जलद अर्धशतक ठोकलं आहे.

मोर्गनच्या शिवाय इंग्लंडकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम जोस बटलर आहे. त्याने 22 बॉलमध्ये तर जेसन रॉयने देखील 22 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं.

इंग्लंडने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 5 विकेटने विजय मिळवला आहे. इंग्लंडने सीरीज 2-1 ने जिंकली. इंग्लंडने आपल्या टी-20 इतिहासात दूसऱ्यांदा 200+ रनचं टार्गेट गाठलं आहे. दोन्ही वेळा विरोधी टीम दक्षिण आफ्रिकाच होती. याआधी 2016 मध्ये मुंबईमध्ये इंग्लंडने 230 रन केलं होते. टी-20 मध्ये हा सर्वात मोठा रनचेज होता.

2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या विरुद्ध 244 रन, वेस्टइंडीजने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 232 रन आणि 2016 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 230 रन केले होते.