बर्थडे विशेष : धोनीचे हे ७ रेकॉर्ड

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ३६वा वाढदिवस आहे. महेंद्र सिंग धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावलेय. काही महिन्यांपूर्वीच त्याने कर्णधारपद सोडले मात्र विकेटकीपर तसेच फलंदाज म्हणून तो संघात खेळतोय.

Updated: Jul 7, 2017, 09:59 AM IST
बर्थडे विशेष : धोनीचे हे ७ रेकॉर्ड title=

मुंबई : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज ३६वा वाढदिवस आहे. महेंद्र सिंग धोनी एकटा असा कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावलेय. काही महिन्यांपूर्वीच त्याने कर्णधारपद सोडले मात्र विकेटकीपर तसेच फलंदाज म्हणून तो संघात खेळतोय.

७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन शतके

करिअरच्या सुरुवातीला धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत असे मात्र जेव्हा त्याने कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याने ७व्या नंबरवर खेळण्यास सुरुवात केली. ७व्या क्रमांकावर फलंदाजीस येताना दोन शतके झळकावण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. 

षटकारांचा राजा धोनी 

मैदानावर नेहमीच लांबच्या लांब षटकार ठोकण्याची धोनीची शैली राहिलीये. धोनीने आतापर्यंत ३२२ षटकार ठोकलेत. यात २०८ षटकार त्याने वनडेत ठोकलेत. 

सर्वाधिक स्टपिंग 

क्रिकेटमध्ये धोनीला चाणाक्ष क्रिकेटर मानले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर १५८ स्टपिंगचा रेकॉर्ड आहे. 

विकेटकीपर असताना सर्वाधिक धावा

एक विकेटकीपर म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावे आहे. धोनीने २००५मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.

७६ टी-२०, १२००हून अधिक धावा, मात्र १ अर्धशतक

धोनीने आतापर्यंत ७६ टी-२० सामने खेळलेत. यात त्याने १२००हून अधिक धावा केल्यात. मात्र केवळ एकच अर्धशतक त्याने झळकावलेय.

आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक विजय

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विजय आहेत धोनीने ७२ टी-२०मध्ये कर्णधारपद भूषवलेय. यातील ४१ सामन्यांत विजय मिळवलाय.

विकेटकीपर असतानाही बॉलिंगचा रेकॉर्ड

हा रेकॉर्ड थोडा विचित्र आहे. विकेटकीपर असतानाही धोनीने ९ सामन्यांत गोलंदाजी केलीये.