बाऊंसर बॉलवर थोडक्यात वाचला वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नर एका सामन्यात थोडक्यात वाचला. फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा एक बाउंसर बॉल वार्नरच्या डोक्याला जाऊन लागला. ज्यामध्ये तो थोडक्यात वाचला.

Updated: Aug 15, 2017, 03:05 PM IST
बाऊंसर बॉलवर थोडक्यात वाचला वॉर्नर title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नर एका सामन्यात थोडक्यात वाचला. फास्ट बॉलर जोश हेजलवुडचा एक बाउंसर बॉल वार्नरच्या डोक्याला जाऊन लागला. ज्यामध्ये तो थोडक्यात वाचला.

यानंतर वॉर्नर रिटायर्ड हर्ट होऊन मैदाना बाहेर गेला. तो पुन्हा बॅटींग करण्यासाठी नाही आला. बांग्लादेश दौऱ्याआधी डार्विनमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दोन टीममध्ये प्रॅक्टीस मॅच खेळत आहे.

वॉर्नर बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याआधी अभ्यास मॅचमध्ये अभ्यास करत होता. डेविडने तो बॉल पूल करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला आणि तो बॉल त्याच्या डोक्याला लागला. त्यानंतर त्याने दुर्लक्ष न करता मैदानातून निघून गेला.

पाहा व्हिडिओ