WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

 अवघ्या काही सेकंदासाठी असलेला हा सामना प्रेक्षकांन एक अभूतपूर्व थराराची अनुभूती देऊन गेला. या सामन्यात लेस्नरने केवळ ३५ सेकंदामध्ये केनला पराभूत केले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 5, 2018, 04:03 PM IST
WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ) title=

नवी दिल्ली : शिकागो येथे पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये WWE स्टार ब्रॉक लेस्नर आणि केन यांच्यात एक जबरदस्त सामना पहायला मिळाला. अवघ्या काही सेकंदासाठी असलेला हा सामना प्रेक्षकांन एक अभूतपूर्व थराराची अनुभूती देऊन गेला. या सामन्यात लेस्नरने केवळ ३५ सेकंदामध्ये केनला पराभूत केले.

WWEच्या इतिहासातील एक विनोदी सामना

WWEच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, केनला एका विरोधी प्रतिस्पर्ध्याने अगदी अत्यल्प वेळात (काही सेकंदात) धूळ चारली. केनची इतकी खराब कामगिरी पाहून केनचे चाहते भलतेच चिडले. आपला राग त्यांनी सोशल मीडियात व्यक्त केला. चाहत्यांचा राग इतका टोकाचा होता की, त्यांनी WWEच्या इतिहासातील एक विनोदी सामना असे या सामन्याचे वर्णण केले.

एफ ५ ने केले पराभूत

शिकागो येथील WWEच्या चाहत्यांचे सारे लक्ष्य लागून राहिले होते यूनिवर्सल टाईटल्स सामन्यावर. अपेक्षित होते की, यूनिव्हर्सल टायटलसाठी केन आणि लेस्नर यांच्यात जोरदार टक्कर होईल. घडले मात्र भलतेच ब्रॉकने केनला एफ५ देत पराभूत केले आणि सामना खिशात टाकला.