IPL 2024: चेन्नईनंतर 'या' टीमचा कॅप्टनही बदलला? अनुभवींना डावलून अनपेक्षित खेळाडूकडे धुरा?

IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये अनेक मोठे बदल पहायला मिळतायत. यावेळी आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सोडून हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे.

सुरभि जगदीश | Updated: Mar 21, 2024, 04:51 PM IST
IPL 2024: चेन्नईनंतर 'या' टीमचा कॅप्टनही बदलला? अनुभवींना डावलून अनपेक्षित खेळाडूकडे धुरा? title=

IPL 2024: उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. शुक्रवारी आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलच्या एक दिवस अगोदर कर्णधारांचं ट्रॉफीसोबत फोटोशूट करण्यात आलंय. यावेळी या फोटोमध्ये दोन नवे चेहरे दिसतायत. यावरून चेन्नई सुपर किंग्ज टीमचा कर्णधार बदलल्याचं दिसून येतंय. यावेळी पंजाब किंग्जच्या टीमची धुरा टीम इंडियाचा युवा खेळाडू जितेश शर्माकडे देण्यात आली का, असा प्रश्न सर्वांच्या मनात आला. मात्र यावेळी जितेश शर्माकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

पंजाब किंग्जचा कर्णधार बदलला नाही

आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये अनेक मोठे बदल पहायला मिळतायत. यावेळी आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सोडून हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. तर आता कॅप्टन्स फोटोशूट दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधारही बदलला का असा गोंधळ चाहत्यांचा झाला होता. कारण कॅप्टन्सच्या फोटोशूटमध्ये पंजाबच्या जर्सीमध्ये जितेश शर्मा दिसून आला. पंजाब किंग्से जितेश शर्माच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 17 व्या सिझनमध्ये पंजाबचं नेतृत्व शिखर धवनकडे असणार आहे. 

जितेश शर्माने गेल्या वर्षी पंजाब किंग्सच्या टीमसाठी चांगली कामगिरी केली होती. यानंतर त्याला भारतीय टीममध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. जितेश शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले असून त्यात त्याने 543 रन्स केले आहेत. त्याची सरासरी 25.86 आहे आणि तो 159.24 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 

आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्जची संपूर्ण टीम 

शिखर धवन ( कर्णधार ), जितेश शर्मा ( उप कर्णधार ), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरन, सिकंदर रझा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्वथ कावरप्पा, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, शशांक सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रौसो.