चॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास

भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण  करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 15, 2017, 09:48 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास  title=

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण  करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे. 

विराटने यापूर्वी 182 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53.82 च्या सरासरीने 7912 धावा केल्या होत्या.  यामध्ये 27 शतके आणि 41 अर्धशतकांचा समावेश होता.   एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 190 सामन्यांमध्ये 182 इनिंग खेळल्या आहेत. 

 विराट कोहलीने १८३ व्या सामन्यांमध्ये १७५ इनिंग खेळल्या. आज ९६ धावा करत सर्वात जलद ८ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने ७८ चेंडूत नाबाद  ९६ धावा केल्या.