चंद्रपूरचा रोहित दत्तात्रय अंडर-१९ टीममध्ये, द्रविड देणार धडे

चंद्रपूरचा असलेला लेग स्पिनर रोहित दत्तात्रय याची भारताच्या अंडर-१९ टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

Updated: Feb 13, 2019, 09:31 PM IST
चंद्रपूरचा रोहित दत्तात्रय अंडर-१९ टीममध्ये, द्रविड देणार धडे title=

चंद्रपूर : चंद्रपूरचा असलेला लेग स्पिनर रोहित दत्तात्रय याची भारताच्या अंडर-१९ टीममध्ये निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ चार दिवसीय मॅचसाठी रोहित दत्तात्रयला संधी देण्यात आली आहे. या सीरिजची पहिली मॅच २० फेब्रुवारीला आणि दुसरी मॅच २६ फेब्रुवारीला सुरु होईल. राहुल द्रविड हा भारताच्या अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक आहे. सुरज आहुजाकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजबरोबरच बीसीसीआयनं ५ मार्चपासून ४ टीममध्ये होणाऱ्या सीरिजसाठी भारत अंडर-१९ ए आणि भारत अंडर-१९ बी टीमचीही घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका अंडर-१९ आणि अफगाणिस्तान अंडर-१९ च्या टीम सहभागी होतील. ५ मार्चला भारत अंडर-१९ ए आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९ एमध्ये मॅच होईल. तर याच दिवशी भारत अंडर-१९ बी आणि अफगाणिस्तान अंडर-१९ च्या टीम भिडतील.

७ मार्चला भारत अंडर-१९ एचा सामना अफगाणिस्तान अंडर-१९ टीमशी होईल. तर ८ मार्चला भारत अंडर-१९ बी विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-१९ बी टीमचा मुकाबला होईल. ९ मार्चला भारत ए आणि भारत बी टीममध्ये स्पर्धा होईल. तर १० मार्चला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये मॅच होईल. या सीरिजची फायनल ११ मार्चला रंगेल. या सगळ्या मॅच तिरुवनंतपूरममध्ये खेळवल्या जातील.

चार दिवसीय मॅचसाठी भारताची अंडर-१९ टीम

सुरज आहुजा (कर्णधार/विकेट कीपर), दिव्यांश सक्सेना, वरुण नयनार, अवनीश सुधा, यशस्वी जयस्वाल, वैभव कांडपाल, शौर्य सरण, ऋतिक शौकीन, मानव सुतार, मनीषी, साबिर खान, अंशुल कम्बोज, राज्यवर्धन हागारगेकर, रोहित दत्तात्रय, रेक्स सिंग, वत्सल शर्मा

भारत अंडर-१९ ए टीम

नेहाल वढेरा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, कामरान इक्बाल, अर्जुन आझाद, प्रियांश आर्य, शाश्वत रावत, ध्रुव चंद जुरेल, सिद्धेश वीर, रवी एम. बिष्णोई, युवराज चौधरी, शुभांग हेगडे, यतीन मंगवानी, ईशान आफ्रिदी, कार्तिक त्यागी, हर्ष दुबे, आकाश सिंग

भारत अंडर-१९ बी टीम

राहुल चंद्रोल (कर्णधार/विकेट कीपर), ठाकूर तिलक वर्मा, वरुण लवांडे, आर्य सेठी, प्रगनेश कानपिलेवार, प्रदोष रंजन पॉल, सीमर रिजवी, नितीश रेड्डी, प्रयास रायबर्मन, शिवम शर्मा, अथर्व अंकोलेकर, सुमित जुयाल, प्रभात मौर्य, सुशांत मिश्रा, पुर्णांक त्यागी, करण लाल