चेन्नई विरुद्ध पंजाब आमनेसामने, चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

या  मॅचचे आयोजन एम  ए चिंदबरम स्टेडिअमवर करण्यात आले आहे.

Updated: Apr 6, 2019, 05:31 PM IST
चेन्नई विरुद्ध पंजाब आमनेसामने, चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय title=

चेन्नई : चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यात आज ६ एप्रिलला मॅच रंगणार आहे. ही मॅच एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या मॅचनिमित्ताने महेंद्र सिंह धोनी आणि रवीचंद्रन आश्विन यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. चेन्नने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ या चॅनेलवर पाहता येणार आहे.

 

चेन्नईने आतापर्यंत आयपीएलच्या या पर्वात ४ मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी पहिल्या ३ मॅचमध्ये चेन्नईने विजय मिळवला. तर मुंबईविरुद्ध झालेल्या चौथ्या मॅचमध्ये ३७ रनने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे चेन्नई ताज्या आकडेवारीनुसार अंकतालिकेत ६ गुणांसह चौथ्या क्रंमाकावर आहे. दुसऱ्या बाजूला पंजाबने देखील ४ मॅचपैकी ३ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. परंतू पंजाबचा नेट रनरेट चांगला असल्याने अंकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पंजाबची टीम : रविचंद्रन अश्विन (कॅप्टन), लोकेश राहुल,  ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, डेव्हिड मिलर, सरफराझ खान, मनदीप सिंग, सॅम करण, मुरुगन अश्विन, अँड्रय़ू टाय आणि मोहम्मद शमी

चेन्नईची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन-कीपर), शेन वॉटसन, अंबाती रायुडू, सुरेश रैना, फॅफ डय़ू प्लेसिस, केदार जाधव, रवींद्र जडेजा,  स्कॉट कुगेलिन, दीपक चहर,  हरभजन सिंग आणि इमरान ताहिर