नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराने दिली गुडन्यूज

टीम इंडियाचा मध्यक्रमातील बॅट्समन चेतेश्वर पुजाराने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवरुन एक गुडन्यूज दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 1, 2018, 04:26 PM IST
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराने दिली गुडन्यूज title=
Image: Twitter

नवी दिल्ली : टीम इंडियाचा मध्यक्रमातील बॅट्समन चेतेश्वर पुजाराने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवरुन एक गुडन्यूज दिली आहे.

चेतेश्वर पुजाराने ट्विट करुन एक आनंदाची बातमी दिली आहे. पुजाराने आपली पत्नी पूजासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

आपण पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची माहिती चेतेश्वर पुजाराने दिली आहे. चेतेश्वर पुजाराने ही आनंदाची बातमी शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.

यासोबतच पुजारासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. आयसीसी टेस्ट क्रिकेटर्सच्या रॅकिंगमध्ये पुजारा एक पायरी चढत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

चेतेश्वर पुजाराचं लग्न १३ फेब्रुवारी २०१३ साली पूजा पाबरीसोबत झालं होतं. गुजरातमधील राजकोटमध्ये चेतेश्वर आणि पूजा यांचा विवाहसोहळा पार पडला होता. पूजा जामनगरमध्ये राहत होती आणि पुजाराची चांगली मैत्रिणही होती.

टीम इंडियाच्या टॉप प्लेअर्सपैकी चेतेश्वर पुजारा एक आहे. जबरदस्त टेक्निक आणि शांत स्वभाव यामुळे चेतेश्वर पुजाराची एक वेगळी ओळख आहे. सध्या पुजारा टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट मॅचपासून होणार असून पहिली टेस्ट मॅच ५ जानेवारी रोजी होणार आहे.

चेतेश्वर पुजाराने दक्षिण आफ्रिकेवरुन ट्विट करत नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

चेतेश्वर पुजाराने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या गुडन्यूजनंतर त्याला आकाश चोपडानेही शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधात ५ जानेवारीपासून टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात तीन टेस्ट मॅच खेळल्या जाणार आहेत.