पराभवानंतरही ख्रिस गेलने असं जिंकलं अनेकांचं मन

हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्वालीफायरच्या फायनलमध्ये अफगानिस्तानने वेस्टइंडिजला 7 विकेटने पराभूत केले. 

shailesh musale Updated: Mar 26, 2018, 10:44 AM IST
पराभवानंतरही ख्रिस गेलने असं जिंकलं अनेकांचं मन title=

हरारे : हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्वालीफायरच्या फायनलमध्ये अफगानिस्तानने वेस्टइंडिजला 7 विकेटने पराभूत केले. 

वेस्टइंडिजने आधी बॅटींग करत 204 रन बनवले. अफगानिस्तानने मॅन ऑफ द मॅच मोहम्मद शहजाद याच्या 84 रन्सच्या जोरावर  तीन विकेट गमावत 40.4 ओव्हरमध्ये सामना जिंकला.

सुपर सिक्समध्ये देखील क्वालीफाय करणार की नाही अशी स्थिती असतांना अफगानिस्तानने फायनल जिंकली. वेस्टइंडिजने जरी सामना गमावला पण ख्रिस गेलने मात्र अनेकांचं मन जिंकलं. गेलने अफगानिस्तानच्या खेळाडुंसोबत डान्स केला.

पाहा व्हिडिओ

अफगानिस्तानसाठी मोहम्मद शहजादने सर्वाधिक 84 रन केले. रहमत शाहने 51 रन केले. मागच्या सामन्यामध्ये अफगानिस्तानने आयरलँडला 5 विकेटने पराभूत करत 2019 वर्ल्ड कपमध्ये आपली जागा निश्चित केली होती.