गावसकर म्हणाले, "जडेजाला आश्चर्याचा धक्का बसत असेल त्यांच्या अंगठ्याचं दुखण अजून बरं कसं होत नाही."

जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या अंगठाल्या दुखापत झाली होती, तेव्हा त्याची

Updated: Mar 4, 2021, 08:31 PM IST
गावसकर म्हणाले, "जडेजाला आश्चर्याचा धक्का बसत असेल त्यांच्या अंगठ्याचं दुखण अजून बरं कसं होत नाही." title=

मुंबई : जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाच्या अंगठाल्या दुखापत झाली होती, तेव्हा त्याची जागा कोण घेईल, असा प्रश्न चाहते आणि क्रिकेट दिग्गजांना पडला होता. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गेल्या एक वर्षापासून बॉलिंग आणि फलंदाजीद्वारे भारतासाठी चांगली कामगिरी बजावत आहे.पण त्याला संघात घेण्याचा अजूनही कोणते संकेत दिसत नसल्यामुळे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ही फिरकी घेतली आहे.

तो भारतीय संघाच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता, परंतु ऑस्ट्रेलिया येथे झालेल्य़ा सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी गावस्कर यांची कमी भरुन काढली. 

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये पदार्पण करताना वॉशिंग्टन सुंदरने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याचवेळी अक्षरने इंग्लंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सामना जिंकला आहे. त्याने तीन वेळा पाच विकेट घेतल्या. इंग्लंडच्या फलंदाजांना ते वाचणे कठीण झाले. 

स्टार स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सुनील गावस्कर यांना विचारण्यात आले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजासाठी अजूनही संधी आहे का? माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी यावर कटाक्ष टाकला आणि सांगितले की जडेजा आश्चर्यचकित झाला असेल की त्याचा अंगठा बरे होण्यास इतका वेळ का घेत आहे?

या प्रश्नाला उत्तर देताना सुनील गावस्कर म्हणाले की, "अंगठ्याला काय झालं, हे रवींद्र जडेजाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, कारण तो डॉक्टरांना विचारत असावा की, पूर्णपणे ठिक होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल. जडेजाला 10 जानेवारीला ही दुखापत झाली होती आणि आता मार्चला सुरुवात झाली आहे.''

यापूर्वी, ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा जखमी झाला होता, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याला कसोटी संघात निवडले गेले नाही. तसेच जडेजाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेच्या संघात स्थान मिळालेले नाही.