CSK vs LSG: लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला कर्णधार रविंद्र जडेजा, म्हणाला...

आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये गतविजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुळात चेन्नई विजयाच्या जवळ होती मात्र अखेरीस गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून रविंद्र जडेजा पुन्हा एकदा फेल झालाय. यावेळी सामन्यानंतर जडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला.

Updated: Apr 1, 2022, 10:36 AM IST
CSK vs LSG: लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला कर्णधार रविंद्र जडेजा, म्हणाला... title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये गतविजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुळात चेन्नई विजयाच्या जवळ होती मात्र अखेरीस गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून रविंद्र जडेजा पुन्हा एकदा फेल झालाय. यावेळी सामन्यानंतर जडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला.

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर कर्णधार जडेजानेही संताप व्यक्त केला. त्याचबरोबर जडेजाने फिल्डर्सच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली. जडेजाने सामन्यानंतर कबूल केलं की त्याला टीमच्या खराब फिल्डींगचा फटका सहन करावा लागला. 

सामन्यानंतर जडेजा म्हणाला, 'आमची सुरुवात चांगली झाली होती पण सामना जिंकण्यासाठी फिल्डींगवेळी कॅच घ्यावे लागतात. त्या संधींचा आम्ही फायदा घेऊ शकलो असतो. मैदानावर खूप दव होतं आणि बॉल आमच्या हातात येत नव्हता."

फलंदाजांचं कौतुक करताना तो म्हणाला, "टॉप 6 फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली, फलंदाजीसाठी विकेट चांगली होती. बॉलिंग युनिट म्हणून आम्हाला योजना आखणं गरजेचं आहे.''

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने लखनऊला 211 रन्सचं टारगेट दिलं. लखनऊने सीएसकेच्या 211 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग केला. या सामन्याचा हिरो ठरला लखनऊचा फलंदाज एविन लुईस ठरला.