धोनीने केलं मतदान तर झिवानं केलं मतदानाचं आवाहन

धोनीने आज मतदानाचा हक्क बजावला

Updated: May 6, 2019, 06:15 PM IST
धोनीने केलं मतदान तर झिवानं केलं मतदानाचं आवाहन title=

रांची : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं आज रांचीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर धोनीनं अनोख्या पद्धतीनं जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यानं मतदारानंतर सोशल मीडियावर केवळ आपला फोटो अपलोड केला नाही. तर आपली लाडकी लेक झिवासमवेत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये झिवा आपल्या आई-वडिलांसारखे तुम्हीही मतदान करा असं सांगत आहेत. हा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५१ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं. यात प्रामुख्यानं उत्तर प्रदेशातील १४, राजस्थानमधील १२, तर पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ७ मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं भवितव्य आज मतदानयंत्रांत बंद झालं. 

जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका मतदानकेंद्रावर हातबॉम्ब टाकला. पश्चिम बंगालच्या बराकपूरमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपानं केला असून तिथं फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. बनगाव, हावरा आणि हुगळीमध्येही मतदानकेंद्र ताब्यात घेण्याच्या तक्रारी दाखल झाल्यात. 

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Use your Power

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on